महाराष्ट्रराजकीयविशेषशहर

चंद्रकांत पाटलांच्या विधानावरुन वसंत मोरेंचे भाजपाला आव्हान..

प्रतिनिधी पूणे दि. २१ मार्च २०२४ भाजपाचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटलांनी वसंत मोरेंच्या उमेदवारी संदर्भात काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेवर वसंत मोरेंनी आपले मत व्यक्त केलं आहे. ‘वसंत मोरे अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिल्यास आम्हाला फारसा फरक पडणार नाही,’ असं चंद्रकांत पाटील त्यावेळी बोलले होते. यावरच प्रतिक्रिया नोंदवताना वसंत मोरेंनी सांगीतले की “त्यांना (भाजपाला) तसा फरक पडला नसता तर 2022 मध्ये त्यांनी मला भाजपामध्ये या असं म्हटलंच नसतं. मॅरिएट हॉटेलमध्ये मला पुरस्कार देण्यात आलेला तेंव्हातर चंद्रकांत पाटील उघडपणे म्हणाले होते की, तुम्ही भाजपामध्ये या. तुम्ही निवडून याल,” ही आठवण सांगितली. तसेच पुढे बोलताना वसंत मोरेंनी, “त्यावेळेस मी त्यांना माझ्या तिन्ही टर्म भाजपाच्या विरोधात लढलेलो आणि मी तिन्ही वेळेस यशस्वी देखील झालेलो,” असं उत्तर दिलेल्याचंही सांगितलं. ही जुनी आठवण ही या वेळी सांगीतली, “त्यामुळेच माझ्या उमेदवारीने काय फरक पडेल हे पुणेकर त्यांना दाखवतील आणि ते त्यांना ही लवकरच दिसेल देखील,” असं म्हणत वसंत मोरेंनी एकाप्रकारे भाजपाला आव्हानच दिल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!