अनधिकृतआंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड मधील सर्वच अनधिकृत बांधकामे व घरे /शॉप तोडू नये अन्यथा ” देवेंद्र भावसार यांनी सामूहिक उपोषणाचा दिला इशारा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०९ फेब्रुवारी २०२५ पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने काल कुदळवाडी /पवारवस्ती /चिखली व आजू -बाजूचे घरे व दुकानें /शॉप अतिक्रमणे सरसकट हटवण्यात आली. परंतु तेथील नागरिक म. न. पा. ला नियमित सर्व प्रकारचे टॅक्स देत आहेत. जे नागरिक नियमित टॅक्स भरत नाहीत. त्यांचेवर रीतसर कारवाई केल्यास कुठलीही अडचण नाही. ज्यांनी कष्ट करून पै -पै गोळा करून घरे -शॉप -दुकान घेतली आहेत. ती आपण अनधिक्तृत ठरवित आहात. आतापर्यंत 20/25 वर्षा पासून तिथून आपण टॅक्स वसुल केलेला आहे.
सरकारचा हा सूडबुढीचा खेळ असून लवकरात लवकर यावर तोडगा काढावा. व सामान्य नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी. पिंपरी -चिंचवड येथे अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे व झोपडपट्टी आहेत. वरील सर्व नागरिकांची म. न. पा. ने पर्यायी व्यवस्था करावी. त्याशिवाय अतिक्रमण कारवाई करू नये. किंवा कोणांचे संसार उद्वस्त करू नये.
अन्यथा आम्ही सर्व नागरिक “सामूहिक उपोषण “करू. पीडित पैकी एकाही व्यक्तीचा जीविताचे बरे -वाईट झाल्यास त्यास म. न. पा. प्रशासन व अधिकारी व मंत्री जबाबदार राहतील. याची नोंद घ्यावी. अशी मागणी भावसार देवेंद्र व सर्व प्रॉपर्टी टॅक्स भरणारे त्रस्त नागरिकांनी केली आहे.

यावेळी पिंपरी-चिंचवड मधी सर्व त्रस्त /पीडित नागरिक उपस्थित होते.
टीप :-ज्यांना या आंदोलनात सहभागी व्हायचे असेल त्यांनी “शांती ~सेना” अध्यक्ष भावसार देवेंद्र.जी. यांचेशी संपर्क साधून नाव नोंदवावे असे सांगण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक- 8329737738

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!