महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

श्री. गुरू नानकजी यांची ५५४ वी जयंती पिंपरी येथे उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ नोव्हेंबर २०२३ काल श्री. गुरू नानकजी यांची जयंती पिंपरी येथे उत्साहात संपन्न झाली.
श्री. गुरू नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक असल्याचे म्हटले जाते आणि त्यांनी ‘इक ओंकार’ हा मंत्र दिला. ते म्हणाले की देव एक आहे आणि सर्वत्र उपस्थित आहे. ते आपल्या सर्वांचे वडील आहेत, म्हणून आपण सर्वांसोबत प्रेमाने जगले पाहिजे. श्री. गुरु नानक देव यांनी लोकांना कल्याणकारी कार्य करण्याचा आणि लोभ सोडून नैतिकतेने पैसा कमवण्याचा सल्ला दिला.
अशा महान श्री. गुरू नानकजी यांच्या ५५४ व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर तर्फे पिंपरी येथील गूरूद्वारा मधे सर्व पंजाबी समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. तुषार कामठे, इंजि. श्री. देवेंद्र तायडे, श्री प्रशांत सपकाळ, राज्य सरचिटणीस श्री राजन नायर, पिंपरी गुरुद्वारातील, गुरुद्वाराचे प्रमुख श्री सुदिंधर आदिवाल व सर्व अधिकारी आणि सर्व पंजाबी समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!