आंदोलनआरोग्यमहाराष्ट्रविशेषसामाजिक

मुलुंड पूर्व येथील रबरी गतिरोधक ठरतेय स्थानिक रहिवाशांना डोकेदुखी..

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुलुंड मूंबई दि. २२ फेब्रुवारी २०२५ द्रुतगती महामार्गावर मुलुंड पूर्व येथे दोन्ही मार्गांवर (मुंबई ते ठाणे बाजू आणि ठाणे ते मुंबई बाजू) वाहनांचा वेग कमी करण्यासाठी “रबरी गतिरोधक” (Road Rumble Strips) बसविण्यात आलेले आहेत. सदर “रबरी गतिरोधक” (Road Rumble Strips) बसवून सुद्धा अनेक वाहने वेगानेच त्यावरून जात असून त्यामुळे प्रचंड प्रमाणात आवाज होत आहे आणि त्याचा त्रास आजू बाजूच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना होत आहे. खरतर या गतिरोधकाचा काहीच उपयोग होत नाही वाहने वेगानेच धावतात यावर लवकरात लवकर पर्याय शोधून मुलुंडकर जनतेला दिलासा द्यावा.
सदर “रबरी गतिरोधक” (Road Rumble Strips) त्वरित काढण्यात यावे यासाठी प्रयास सेवाभावी संस्था अध्यक्ष ॲड. सागर देवरे यांनी संबंधिताना निवेदन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!