
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १८ मार्च २०२५ पद्मिनी द रियल वुमन या फोरमच्या माध्यमातून जागतिक महिला दिन व हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने चिंचवड शॉपिंग फेस्टिवलचे चिंचवडे लॉन्स येथे १५ व १६ मार्च रोजी चिंचवड वाल्हेकरवाडी या परिसरात पहिल्यांदाच आयोजन केले होते. कार्यक्रमाचे आयोजक सौ. ज्योतीताई भालके व ज्योतीताई निंबाळकर यांनी महिलांच्या उद्योगाला व्यवसायाला एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभारी संजोग भाऊ वाघेरे पाटील व युवा नेते राहुलदादा कलाटे माजी नगरसेवक व ज्येष्ठ साहित्यिक अरुणजी बोराडे मा. शिक्षण मंडळाचे सभापती नाना शिवले सर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी शहरांमध्ये काम करणारे अनेक आजी-माजी नगरसेवक, पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांनी हजेरी लावली दुसऱ्या दिवशी देखील जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना सन्मान देऊन पुरस्कृत करण्यात आले समाज प्रबोधनाचे काम वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ह.भ.प. सविताताई नवनाथ काळजे महाराज, ह.भ.प.अंजलीताई गुरव महाराज, ह.भ.प. काजल ताई भेगडे महाराज यांना देखील पुरस्कार प्रदान करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील परिचारिका अंगणवाडी सेविका महिला बचत गट भजनी मंडळ यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले या चिंचवड शॉपिंग फेस्टिवल मध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या खरेदीचा आनंद ग्राहकांनी घेतला.



