गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

जेष्ठ नागरीकाच्या तोंडास मिरची पावडर चोळुन, मनी ट्रान्सफरची २७, २५,८००/- रू रोख रक्कम लुटणाऱ्या ०४ आरोपींना गुन्हे शाखेकडुन अटक.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३० नोव्हेंबर २०२३ निगडी पोलीस ठाणे गुरनं ६६६ / २०२३ भादवि कलम ३९४, ३४ या गुन्हयातील फिर्यादी नामे प्रकाश भिकचंद लोढा, वय ६८ वर्षे, रा. एल आय जी कॉलनी, सिंधुनगर, प्राधिकरण, निगडी, पुणे. हे दिनांक १४/११/२०२३ रोजी रात्री २२:४५ वाचे सुमारांस जाधववाडी, तळवडे,
मोरेवस्ती चिखली येथे मनी ट्रान्सफरची एकुण मिळुन २७,२५,८००/- रू रोख रक्कम गोळा
करून त्यांचे स्कुटरवरून दुर्गानगर चौकाकडुन रहाते घरी जात असताना, हत्ती चौक ते एल
आय सी कॉर्नर दरम्यान, यमुनानगर निगडी पुणे येथे आले असता त्यांचे पाठीमागुन मोटार
सायकल वरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांचे स्कुटरला धक्का देवुन फिर्यादी यांचे चेहऱ्यावर मिरची पावडर लावुन, त्यांना जखमी करून धक्का बुक्की करून, त्यांचे जवळील रोख रक्कम असलेली पैश्याची सॅक बॅग जबरदस्तीने हिस्कावुन घेवुन गेले होते त्याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
वरील प्रमाणे गंभीर गुन्हा नोंद झाल्यानंतर, गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन, मा पोलीस
आयुक्त विनयकुमार चौबे, यांनी गुन्हे शाखेतील सर्व युनिट व शाखा यांना सदर गुन्हयाचा
समांतर तपास करणेबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे पोलीस उपआयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे
मॅडम सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १, बाळासाहेब कोपनर यांनी सदर गुन्हयाचा समांतर तपास
करणेकामी गुन्हे शाखा युनिट १ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना आदेश दिले.
त्याप्रमाणे वपोनि शैलेश गायकवाड, संतोष पाटील यांनी दरोडा विरोधी पथक, युनिट १,२,३,४ खंडणी विरोधी पथक व तांत्रिक विश्लेषन विभागाचे अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून, सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला होता. त्याप्रमाणे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देवुन प्राप्त प्राथमीक माहितीच्या आधारे, फिर्यादी यांचे कलेक्शन करण्याच्या मार्गे याची पाहणी करून, स्थानिक परिसरातील गोपनीय बातमीदारामार्फत माहिती संकलित करून, दोन अनोळखी निष्पन्न केले. त्याअनुषंगाने तपास करीत असताना, मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे आरोपी नामे १) विशाल साहेबराव जगताप, वय २५ वर्षे, रा. श्रीराम कॉलनी, टॉवर लाईन, चिंचेचा मळा, मोरेवस्ती, चिखली, पुणे. मुळगाव मुं.पो. संक्रापुर, ता. राहुरी, जि. अहमदनगर यास कुरूळी फाटा, पुणे नाशिक हायवे येथुन दरोडा विरोधी पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडुन गुन्हयातील चोरी केलेल्या रक्कमेपैकी त्याचे वाटयास आलेली ८,०१,५००/- रू रोख रक्कम त्याचेकडुन हस्तगत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!