गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

साडे सात किलो गांजा सह एकाला पिंपरी येथून अटक

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.०९ डिसेंबर २०२३ साडेसात किलो गांजा सह एकाला पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथून अटक केली आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी दि.०६ रोजी दुपारी केली.

जितेंद्र मगन कोळी वय ३३ रा. शिरपूर, धुळे असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई कपिलेश इगवे यांनी फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा संत तुकाराम नगर येथील मुख्य अग्निशमन केंद्रासमोर उभारला होता. याची खबर अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
यावेळी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून ०७ लाख ४३ हजार ८०० रुपयांचा सात किलो ४३८ ग्रॅम वजनाचा गांजा व १५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ०७ लाख ५८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी हा तेथे गांजा विक्रीसाठी आल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपीवर पिंपरी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!