बहुजन भिम सेना राष्ट्रीय अध्यक्ष आयु. मोहनराव मस्के यांचा राजीनामा अखेर कार्यकर्त्यांच्या विनंती मुळे घेतला मागे..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २३ मे २०२५ बहुजन भिम सेना पक्षाचे प्रमुख, संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष आयु. मोहनराव मस्के यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिनांक २० मे २०२५ रोजी काही वैयक्तीक कारणामुळे, कोणत्याही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना विचारात न घेऊन किंवा त्यांच्या बरोबर कसलीही चर्चा न करता राजीनामा दिला होता.
हा राजीनामा महाराष्ट्र कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रा. प्रवीण गायकवाड, महासचिव प्रा. दिलीप लोखंडे व कार्याध्यक्ष प्रा. बी. बी. शिंदे यांच्या कडे दिला. असे सोशल मिडियाद्वारे (SMS) कळवून त्यांनी आपला मोबाईल बंद करुन ठेवला. त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांन मधे धावपळ वाढली, चिंतेत पडलेल्या कार्यकर्त्यांनी जेव्हां ही बाब कार्यकारिनी सदस्यांना सांगीतली तेव्हां कार्याध्यक्ष प्रा. बी. बी. शिंदे आपल्या काही सहकार्यांना सोबत घेवून दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. २१ मे २०२५ रोजी अध्यक्षांचा मोबाईल सूरू झाल्यानंतर त्यांच्या भेटीची वेळ घेऊन कार्याध्यक्ष प्रा. बी. बी. शिंदे व त्यांचे सहकारी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आयुष्य. पँथर दत्ताभाऊ गायकवाड यांचे सोबत संस्थापक अध्यक्षांना भेटून त्यांच्याशी चर्चा करुन, त्यांचे मन वळवणास यशस्वी झाले.
यावेळी प्रा. बी. बी. शिंदे यांनी सांगीतले की बहुजन भिम सेना या राजकीय पक्षाची स्थापना मोहनराव म्हस्के यांनी दि. १४ एप्रिल १९९४ रोजी करुन अती त्यागाने समाजाप्रती बांधील राहून, फुले शाहू आंबेडकर आण्णा भाऊ यांची विचारधारा, घराघरात पोहोचवण्या करीता तसेच बहुजन भिम सेना या राजकीय पक्षाची भूमिका स्पष्ट करुन महाराष्ट्र राज्यातील प्रमुख कार्यकर्ते यांना बळ देऊन लढायला शिकवले, अशा मार्गदर्शक मान्यवर मोहनरावजी मस्के साहेब यांनी राजीनामा देणे म्हणजे, कार्यकर्ते यांची पिछेहाट झाली असती याची जाणिव अनेक उपस्थित कार्यकर्ते यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केली.
उपस्थित सर्वांच्या विनंतीस मानदेवून मोहनरावजी मस्के यांनी पूढे अक्षक्षपदावर राहून काम करत राहिल असे उपस्थितांना सांगीतले या नंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन ही केले.



