
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३१ मार्च २०२५ काल दि. ३० मार्च २०२५ रोजी विठ्ठलनगर नेहरूनगर येथे भिमाई हाउसिंग सोसायटी बिल्डींग नंबर एक या ठिकाणी भिमाई बुद्ध विहार येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली.
नेहरूनगरचे कार्यक्षम नगरसेवक राहुलभाऊ भोसले व माजी महापौर वैशाली ताई घोडेकर ( लोंढे) यांच्या हस्ते मुर्तीची स्थापना करण्यात आली.
या वेळी विहाराचे अध्यक्ष शिवशंकर उबाळे तसेच विहार कमिटीचे पदाधिकारी उपासक साहेबराव शिंदे, अनिल काकडे, सचिन गायकवाड, भिमा जावळे, विलास शिखरे, अदित्य शिंदे, विजय कांबळे तसेच महीला उपासिका व धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित उपासक व उपासिका यांना राहुलभाऊ भोसले व वैशालीताई घोडेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बुद्ध विहारांमध्ये महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती व महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावरती गीत सादर करण्यात आले यानंतर वार्डाचे माजी नगरसेवक राहुलभाऊ भोसले व वैशालीताई घोडेकर यांचा भिमाई बुद्ध विहाराच्या वतीने विहाराचे अध्यक्ष शिवशंकर उबाळे व उपस्थित पदाधिकार्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी आवर्जून उपस्थित असलेले धम्मानंद बुद्ध विहाराचे अध्यक्ष अविनाश चौधरी यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित महीलांचा देखील सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमशाही युवा संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष नितीन कसबे यांनी केले.
अध्यक्षांनी उपस्थित सर्व बांधवांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे आयोजन भिमाई बुद्ध विहाराच्या वतीने करण्यात आले होते.