अजब पालिकेचा गजब कारभार मूठभर पैशासाठी दिला नदीपात्रात बांधकाम परवाण्याचा प्रकार..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ एप्रिल २०२५ पिंपरी चिंचवड महापालिकेत अनेक विभागातील महत्वाचा घटक म्हणून ज्युनिअर इंजिनिअर मानला जात असतो. मात्र, हाच ज्युनिअर इंजिनिअर जर भ्रष्ट कारभार करत असेल तर तो काय काय करू शकतो हे यावरून दिसू येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका बांधकाम परवानगी विभागातील आहे.
कासारवाडी येथील सर्वे नंबर १९०८ मधील काही भाग निळ्या पूररेषेमध्ये येतो. त्यामुळे त्या भूखंडावर बांधकाम परवानगी मिळू शकत नाही. मात्र, या पूर रेषेतील भूखंडावर नेहमी एका खासदाराचे नाव घेऊन इतरांना दमदाटी करणाऱ्या ज्युनिअर इंजिनिअरने चक्क पैसे घेऊन बांधकाम परवानगी दिल्याचे समजते.
शासनाच्या UDCPR नियमानुसार पूररेषेत येणाऱ्या भूखंडावर बांधकाम परवानगी देता येत नाही. मात्र या ज्युनिअर इंजिनिअरने भलीमोठी रक्कम घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेक करत परवानगी दिली आहे.
जरी जुन्या चाळीच्या जागेवर ही परवानगी दिली असली तरी नियमानुसार ज्या बांधकामास कंप्लेक्शन मिळून ३० वर्षे पूर्ण झालेत अशा बांधकामास (रिडेव्हलेपमेंटस्कीम) द्वारे परवानगी देता येते मात्र या पूर्वीची कसलीही परवानगी नसताना आणि भूखंड पूररेषेत असतानाही या बांधकामास कशी काय परवानगी दिली अशी विचारणा होत आहे. पूर रेषेमधील परवानगी दिलेल्या इमारती मधील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
वेळोवेळी (हा महाभाग) बांधकाम विभाग इतरांना हलक्या जातीचे आहे असे ” हिनवणाऱ्या या अती हुशार ज्युनिअर इंजिनिअरला बांधकाम परवानगी विभागाची आवश्यक अशी कोणती ही माहिती नाही. तरीही केवळ पैसे खाण्याच्या लालचेने हा ज्युनिअर इंजिनिअर बांधकाम विभागाशिवाय इतर विभागात जास्त काळ थांबत नाही. सन २०१६ पूर्वी हाच भ्रष्ट ज्युनिअर इंजिनिअर बांधकाम विभागात ६ वर्षे कामास होता. मागे अनेक तक्रारी याचे विरोधात झाल्या नंतर त्याची बदली पाणी पुरवठा विभागात केली. त्याहीविभागात अनेक तक्रारी वाढल्या पुन्हा वरिष्ठावर दबाव आणून पुन्हा बांधकाम विभागात बदली करून घेतली. आपला मोठा वशिला आहे. मी कोणाला ही घाबरत नाही अशी गुर्मीची भाषा बोलणाऱ्या या ज्युनिअर इंजिनिअरने भरपूर पैसे घेऊन अनेक चुकीच्या कामांना परवानग्या मिळवून दिल्या असाव्यात. त्यामुळे त्याच्या सर्व कामांची चौकशी केल्यास अनेक चुकीची कामे निदर्शनात येतील असे अनेकजण आपापसात बोलताना सांगत आहेत. मागील आठवड्यात याच ज्युनिअर इंजिनिअरने खराळवाडी पिंपरी येथील एका फ्लॅट मालकाला कसलीही चौकशी न करता, मनपाकडे लेखी तक्रार करण्याच्या अगोदरच भेटून दमदाटी करून तोंडी पैशाची मागणी केली होती. बांधकाम विभागाची पूर्ण माहिती ही नसणाऱ्या, नागरिकांना दमदाटी करणाऱ्या कामाबाबत अनेक तक्रारी असून ही, पैसे घेऊन चुकीची कामे करणाऱ्या या भ्रष्ट ज्युनिअर इंजिनिअरला पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन का पाठीशी घालत आहे ?याबाबत महापालिकेत उलट सुलट चर्चा सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे.
