आजच्या भारत देशासोबत जोडलेले चलन याबाबत विश्लेषण करताना: संदर्भ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे द प्रोब्लेम ऑफ रूपी: सामाजिक कार्यकर्ता राजन नायर.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.०३ एप्रिल २०२५ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या द प्रोब्लेम ऑफ रूपी हे पुस्तक भारतीय आर्थिक इतिहासात फार महत्वपूर्ण कृती आहे. जे मुद्रा स्मृती आणि मुद्रा सुधार या मुद्यांवर जे ज्ञान आणि विश्लेषण केले त्यामुळे त्यांचे विचार करण्याची पद्धत व दूरदृष्टी निदर्शनास येते.
द प्रोब्लेम ऑफ रूपी या पुस्तकात लिहिलेले मुद्दे आजही प्रासंगिक आहेत. कारण मुद्रा स्मृती आणि मुद्रा अभिमुल्य आजही काही देशांची प्रमुख आर्थिक समस्या आहे. आज भारत देशात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर असते तर संपूर्ण भारत देश आर्थिक सधन देश बनला असता. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकोनाॅमिक्स मध्ये पदवीधर होण्याचे शिक्षण घेत असताना प्रबंध लिहीले आणि त्यावेळी आकस्मिक येणारे आर्थिक संकट यातून त्यांचे दिर्घ विश्लेषण आणि बौद्धिक क्षमता असे दर्शवते कि, आजही भारताच्या चलनाचे मुल्य डाॅलरच्या मुल्याच्या मानाने पाहिले तर, खूपच फरक आहे. ही गोष्ट डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यावेळीच जाणवली असावी असे वाटते, कारण त्यांनी पदवीचे शिक्षण घेताना जो प्रबंध लिहीला त्यातून दिसून येते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहीताना फार महत्वाची भूमिका बजावली होती. यातून आपणाला समजते की, बाबासाहेब आंबेडकर यांचे दूरदृष्टी विचार होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर एक अर्थ शास्रज्ञ होते. एक महान सामाजिक कार्यकर्ता होते. यावेळी नायर म्हणाले की मी आज माझे विचार आपणासमोर ठेवत असताना मला फार अभिमान व आनंद होत आहे की, खूप सारे जगप्रसिद्ध अर्थ तज्ञ झाले, जसे ॲडम स्मित असो, डेव्हिड रिचर्ड असो, आल्फ्रेड मार्शल असो, जाॅन केनस असो, मिल्टन फ्रेडमॅन असो, अभिजीत बॅनर्जी असो यांच्या पेक्षा ही ज्ञानी आणि बुद्धीमान माझे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होते असे मी मानतो. कारण त्यांचे विचार, आर्थिक ज्ञान, एक उच्च बुद्धीमत्ता प्राप्त केलेली व्यक्ती होते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. भारताचे नोबल प्राईज इकोनाॅमिस्ट डॉ. अमात्य सेन यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत असे म्हणाले की, ” डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे माझे अर्थशास्त्र जनक आहेत. बाबासाहेबांचा खूप मोठा सोहळा करून मान सन्मान करणे आवश्यक कारण त्यांनी अतिशय गरीब लोकांचा विचार केला. ते गरीबांसाठी एक विजेता आहेत. आज पर्यंत जे काही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनात मान सन्मान मिळविला त्यापेक्षा ही जास्त मान सन्मानाचे ते हक्कदार आहेत. ते आपल्या देशातले एक महान व्यक्ती होते. त्यांनी आर्थिक समस्या जाणून जे काही बदल घडवून आणले ते अप्रतिम व अवर्णनीय आहेत.”
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण अशा स्थितीत गेले कि, आर्थिक समस्या, कोणताही विकास नाही अशी ती वेळ होती पण त्यातूनही मार्ग काढत ते आज एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ झाले त्यांच्या या विचारांना माझा मानाचा मुजरा!!
नायर आपले विचार व्यक्त करत असताना पुढे बोलले की, जगात खूप सामाजिक कार्यकर्ते व नेते झाले जसे महात्मा गांधी आणि असे अनेक पण त्यावेळेची परिस्थिती पाहता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यावेळेच्या प्रस्थापित लोकांनी, मनुवादी विचारांच्या लोकांनी एक बौद्धिक, एक अर्थशास्रज्ञ यांच्या नात्याने, त्यांच्या शिक्षणाचा उपयोग करून घेतला असता तर भारत देशाचा खूप विकास झाला असता. देशात अनेक नेते होऊन गेले पण सर्वात प्रथम क्रमांकावर सर्व प्रश्नाचे उत्तर फक्त आणि फक्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. आज आमचे दुर्दैव आहे की, ते आज आपल्या सोबत नाही त्यांची गरज खरीतर आज होती.
त्यांनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक बदल केले अस्पृश्यता काढून टाकली. गोरगरीब, वंचित, शोषित, दलित यांच्या साठी बाबासाहेब शेवटपर्यंत ठाम उभे राहिले. खरंच खूप महान व्यक्तिमत्व होते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रोब्लेम ऑफ रूपी या पुस्तकामुळे ब्रिटिशच्या आयोगाकडे हा प्रस्ताव ठेवला कि, रिजर्व बॅंकची स्थापना झाली पाहिजे आणि रिजर्व बॅंकेची स्थापना होण्यासाठी १९२६ मध्ये शिफारस केली गेली आणि त्यानंतर भारतीय रिजर्व बॅंक ची स्थापना १ एप्रिल १९३५ मध्ये भारतात करण्यात आली. याचे खरे मार्गदाता
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. त्यांनी राज्यघटनेची चौकट फार बौद्धिक रितीने तयार केली. आपल्याला माहित आहे राज्य घटना तयार करताना त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. सामाजिक न्याय व समानता सुनिश्चित केली त्याचबरोबर समुदायाचे हलके जीवन बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांचा सामाजिक प्रभाव त्यांच्या भाषणातून व लेखणीतून दिसून येतो. जातीभेद व हक्काचे समर्थन करण्यासाठी त्यांची भूमिका नेहमी आव्हानात्मक असे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्धिक प्रभावाबाबत बोलायचे झाले तर, त्यांच्या कल्पना भारतीय विचारवंत व राजकारणी मतभेद दूर करणे, वादविवाद व सामाजिक न्यायाला आकार देणे, कायदे व संधी सर्वांसाठी असावेत अशा प्रकारचे होते .
या सर्व गोष्टी विचारात घेऊन सार्वत्रिक बौद्धिक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानेच भारतीय रिजर्व बॅंकेची स्थापना झाली.
मला खूप अभिमान वाटतो कि, पुणे शहराच्या औंध रोड येथील सिद्धार्थ बुद्ध विहार मध्ये उभा राहून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माझ्या सद्भावना व्यक्त करत आहे.
पूढे नायर बोलले की डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त बौद्ध समाजातच शोधू नका तर त्यांना प्रत्येक जातीधर्मामध्ये शोधा. समाजात, देशासाठी काम करत असताना त्यांनी महिलांना देखील प्राधान्य दिले आहे. त्यांचा मुख्य उद्देश महिला सशक्तीकरण होते आणि आज त्यांच्या विचारधारे मुळे आज किती तरी महिला प्रगती करत आहे.
या सर्व गोष्टी स्मरणात ठेवून एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी त्यांना विनम्र अभिवादन करितो आणि त्यांची विचारधारा घेऊन देशात एकजूटीने क्रांती आणण्याचे कार्य आपण करू अशी आशा व्यक्त करितो.
शेवटी त्यांनी आयोजकांचे आभार मानले यावेळी ते म्हणाले आपण मला या ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रोब्लेम ऑफ रूपी या बाबत बोलण्याची संधी दिली याबद्दल मी ॲड रविंद्र अरू सर, सिद्धार्थ ओहोळ सर, संजय कांबळे सर, किशोर वाघमारे सर यांचे मनापासून आभार व्यक्त करितो. यावेळी औंध रोड परिसरातील असंख्य जनसमूदाय उपस्थित होता.