कलामहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छाशोध इतिहासाचा..सामाजिक

फुले सृष्टीच्या कामा संदर्भात सुप्रसिद्ध शिल्पकार श्री. महेंद्र आनंदराव थोपटे यांच्या सोबत आढावा बैठक संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ एप्रिल २०२५ पिंपरी येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या समूह शिल्पासह तिथे फुले सृष्टी निर्माण करण्यात येणार आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित ही फुले सृष्टी निर्माण करण्याचे काम सुप्रसिद्ध शिल्पकार श्री महेंद्र आनंदराव थोपटे यांच्या ‘कला संस्कार आर्ट स्टुडिओ’ या संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी सावित्रीबाई फुले स्मारक समिती व महात्मा फुले स्मारक समितीच्या प्रमुख प्रतिनिधींबरोबर महत्वपूर्ण बैठक आज थोपटे यांच्या कार्यशाळेमध्ये आयोजित करण्यात आली होती. या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करून सध्या निर्माण करण्यात येत असलेल्या म्युरल्सची पाहणी करून काही महत्त्वपूर्ण सूचना त्यांना करण्यात आल्या. संबंधित प्रकल्प ३१ जुलै पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आली असून त्याच्या प्रगतीचा वारंवार आणि नियमितपणे आढावा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये स्वतः शिल्पकार महेंद्र थोपटे आणि वास्तुविशारद गिरीश चिध्धरवार सहभागी होते.
सोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे, ज्येष्ठ समाजसेवक मानवजी कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, विशाल जाधव, ॲड. विद्याताई शिंदे, रोहिणीताई रासकर, वंदनाताई रासकर, सुरेखाताई माळी, शंकरदादा लोंढे, प्रदीप पवार, प्रकाश गोरे असे अनेक सहकारी मित्र यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!