अपघातमहाराष्ट्रविशेषसामाजिक

ॲड. संजय बाबाजी ढाकणे यांचा सरकारी दवाखान्याजवळ  रस्ते अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यु..

विशेष प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगांव दि. ०६ एप्रिल २०२५ या बाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक ०५ मार्च शनिवार रोजी सायंकाळी ०७ : ३० मिनिटांनी गेवराई शेवगांव रस्त्यावर गर्जेवस्ती आणि ग्रामीण रुग्णालयाच्या मध्ये ॲड. संजय बाबाजी ढाकणे वय ४९ वर्षे, रा. हसनापूर हल्ली मुक्काम श्रीराम कॉलोनी शेवगांव ते शेवगांव वकील संघाचे सदस्य ऋणानुबंध लॉन्सचे संचालक सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असायचे काल हासनापूर गावाकडून शेवगांवला येत असताना शेवगावहून गेवराई रस्त्याला जात असलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गुढग्याला डोक्याच्या मागे आणि कानाजवळ मार लागुन मृत्यु झाला आज सकाळी त्यांचे शवविच्छेदन करून शेवगाव पोलिसांनी त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला शेवगांव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशनचे पि. आय. समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे कॉ. अरविंद चव्हाण हे तपास करीत असुन शेवगांव पोलीस सखोल तपास  करत आहेत त्यांच्या अंत्यविधी सकाळी ११ वाजता त्यांच्या शेवगांव येथील शेतात शेवगांव तालुका वकील संघटनेच्या सर्व सदस्य आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला.

ताजा कलम
मागील वर्षी रस्ते अपघातात  जेष्ठ विधीज्ञ ॲड विजयराव काकडे यांचे पण दुःखद निधन झाले होते शेवगांव शहरातील अतिक्रमण  वाहतुक कोंडी आणि रस्त्यावर भरणारा बाजार यामुळे कायमच वर्दळ असते नगरपरिषद हद्दीतील सर्व रस्ते मोकळा श्वास केव्हां घेणार व बाह्यवळण रस्ता केव्हां होणार याची विचारणा नागरिक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!