
बुद्ध जयंती निमित्त “महाबुद्धवंदनाचा सोहळा” मावळमधील कार्ला बुद्ध लेणीवर..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २७ एप्रिल २०२५ “महाबुद्धवंदना सोहळा” पूढील महिन्यात कार्ला बुद्ध लेणी येथे बुद्ध जयंती दिनी होणार साजरा. यासंदर्भातील सविस्तर वृतांत असा आहे. संपूर्ण जगामध्ये बुद्ध जयंती ही भव्य दिव्य प्रमाणात साजरी केली जाते त्यासाठी ते एक महिना अगोदरच तयारीला सुरुवात करतात, जसा आपल्या भारतामध्ये भीम जयंतीचा उत्साह असतो, सर्व संघ विहारे, व आपण मोठ्या उत्साहात बुद्ध जयंती साजरी केली पाहिजे. सम्राट अशोका मुळे आपल्याला बुद्ध कळाले ते त्यांनी बांधलेले ८४ हजार लेणी स्तूपामुळे, शीलालेखामुळे, खरंच बुद्धांचे अस्तित्व हे लेण्यांमध्येच आहे. त्या लेण्यांचे जतन करणे, भेट देणे, संवर्धन करणे, त्या लेण्यांचा इतिहास सांगणे, ऐकणे, भावी पिढीला लेण्या बद्दल आस्था निर्माण करणे, अडीच हजार वर्षांपूर्वीचा सम्राट अशोकाचा इतिहास जनमानसांपर्यंत पोहोचविणे हे प्रत्येक बौद्ध बांधव भगिनींचे, संघाच्या पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य, जबाबदारी आहे, खऱ्या अर्थाने बुद्ध जयंती ही “बौद्ध लेण्यावरच” साजरी केली पाहिजे ही काळाची गरज आहे. तेथे जाणे येणे केल्यामुळे लेण्या सुरक्षित राहण्यासाठी मदत होईल, त्यांच्यावर देखरेख राहील.. त्यासाठीच आपण बुद्ध जयंती निमित्त आदरणीय भंते धम्मानंद व श्रामनेरी भिकू संघ, सर्व लेणी संवर्धक टीम, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, व सर्व आंबेडकरी संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली “महाबुद्धवंदनाचा सोहळा” कार्ला बुद्ध लेणीवर घेतला आहे. तरी आपण सर्वांनी वेळात वेळ काढून, पर्यायी सुट्टी घेऊन कुटुंबासह, नातेवाईक मित्र परिवारासह दि. १२ मे २०२५ रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित रहायचे आहे, तसेच या मंगलमय सोहळ्यास आपण धम्मदान, श्रमदान, भोजनदान, चीवर दान, आरोग्यरूपी दान, आपल्याला जे शक्य असेल ती मदत, आपल्या हातून आपल्या आयुष्यातील या मंगलमय सोहळ्यात पुण्य कर्माचे काम घडो ही मंगल कामना तसेच या सोहळ्यास आपली अमूल्य उपस्थिती प्रार्थनीय आहे. “लेणी वाचवूया, लेणीवर जाऊया” महा बुद्ध वंदना दि. १२ मे २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता कार्ला बौद्ध लेणी, तालुका मावळ, जिल्हा पुणे या ठीकाणी सर्वांनी आवर्जून या व देश बौद्धमय करण्यास उपस्थित राहून या संकल्पनेकरिता शूभकामना करा ..
संपर्क क्रमांक- 8329612897, 8888309972, 9762886634




