शहरसामाजिक

राजमुद्रा प्रतिष्ठाणचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आ. आशुतोष काळे

(कोपरगाव-प्रतिनिधी-अजय विघे) कोपरगाव :-सामाजिक बांधिलकी जोपासत सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात राजमुद्रा प्रतिष्ठाण घेत असलेला पुढाकार व त्यांचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवद्द्वार आ. आशुतोष काळे यांनी काढले.
कोपरगाव शहरातील राजमुद्रा प्रतिष्ठाणच्या वतीने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री सप्तशृंगी पालखी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री नर्मदा महापुराण’ सोहळ्यात आ. आशुतोष काळे यांनी श्रींची आरती करून मनोभावे दर्शन घेतले तसेच कथाकार परमपूज्य साध्वी शारदानंदगीरीजी माताजी यांचे आशिर्वाद घेतले. याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, अडीअडचणीच्या वेळी समाजाला अपेक्षित असलेली मदत करतांना रक्तदान शिबीर, मोफत सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्याबरोबरच धार्मिक कार्यक्रम राबविण्यात देखील मागील २८ वर्षापासून राजमुद्रा प्रतिष्ठान नेहमी अग्रेसर असते. वाढदिवसाच्या निमित्ताने देखील सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्याची परंपरा त्यांनी जपली आहे. त्यामुळे सामाजिक कार्याबरोबरच धार्मिक कार्यात देखील त्यांचा नेहमीच सहभाग निश्चितपणे कौतुकास पात्र असून अशा सामाजिक व धार्मिक कार्यास काळे परिवाराने नेहमीच सर्वोतोपरी मदत केली असून यापुढेही हि परंपरा अशीच सुरु राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले व श्री सप्तशृंगी पालखी महोत्सवात सहभागी भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राजमुद्रा प्रतिष्ठानचे वाल्मिक लहिरे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, अजीज शेख, युवक शहराध्यक्ष नवाजई कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, राहुल देवळालीकर, चंद्रशेखर म्हस्के, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैरनार, संदीप कपिले, धनंजय कहार, राजेंद्र साबळे, मनोज नरोडे, शैलेश साबळे, मुकुंद भुतडा, विकि जोशी, विलास आव्हाड, मुकुंद इंगळे, विशाल गुंजाळ, ऋषीकेश खैरनार, योगेश अमृतकर, विजय दाभाडे, एकनाथ गंगले, अक्षय आंग्रे, गणेश बोरुडे, संतोष बारसे, कैलास मंजुळ, अक्षय बारसे, अमोल शिंदे, किरण कोपरे, एकनाथ राक्षे, दत्तात्रय जोर्वेकर, संदीप चौधरी, विकी सातोटे, अजित इंदरखे, गणेश जोर्वेकर, पवन मेहेरे, रविंद्र साळवे, रविंद्र वाघ, संतोष साळवे, कृष्णा कडलग, शंकर गंगुले, राहुल चवंडके आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाप्रती बांधिलकी काय असते हे आ. आशुतोष काळे यांच्याकडून आम्ही शिकलो असून राजमुद्रा प्रतिष्ठानने आ. आशुतोष काळे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नेहमीच सामाजिक धार्मिक उपक्रम राबवीले आहे. यापुढेही असे सामाजिक धार्मिक उपक्रम आयोजित करून समाजासाठी काम करू वाल्मिक लाहीरे (अध्यक्ष राजमुद्रा प्रतिष्ठान)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!