
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १३ मे २०२५ सुवर्ण क्षणांचे साथीदार -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजीव गांधी
माध्यमिक विद्यालय नेहरूनगर येथील इयत्ता दहावी बॅच १९९७ – १९९८ मधील विद्यार्थ्यांनी आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यालयाच्या प्रांगणात ११ मे २०२५ सकाळी १० ते सायंकाळी ०६ वाजे पर्यंत स्नेहमेळावा उत्साहात झाला. या स्नेहमेळाव्याची सूरूवात ज्ञानज्योती माता सावित्रीबाई फूले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व दिप प्रज्वलीत करून झाली. या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड शहरासह, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी उपस्थित होते. तसेच आदरनिय मुख्याध्यापिका नलिनी जाधव मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रूपाली रोकडे-साळुंके,
वैशाली जाधव, सुजाता आहिरे, विद्या कदम, सिमा भोसले, राधा मोरे, कालिंदा तिनम, रेश्मा शेटे, सिता गायकवाड, जया डेंगळे, दिक्षा बनसोड, विरेंद्र वाल्मीकी, अर्जून पवार, संजय परबते, आतूल सातपुते, सचिन थोरात, विनोद ससाणे, अनवर पठाण, जरे, विकास गायकवाड, सचिन पालके यांनी मोलाचे योगदान दिले.
आदरनिय श्री. अंकुशराव सर, श्री. संपत पानसरे
श्री. तांबोळी सर, श्री. ढोबळे सर, श्री. पाईकराव सर यांनी आपली उपस्थिती कार्यक्रमास दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली व विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन रूपाली रोकडे-साळुंके व वैशाली सूपेकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रूपाली रोकडे-साळुंके व सिमा पंडित यांनी केले. मैना पालके यांनी उपस्थितांच्या मनापर्यंत पोहोचेल असे भावनिक भाषण केले. या भाषणाने उपस्थितांनी टाळ्यांच्यागजरात पालके यांना प्रतिसाद दिला.
हा कार्यक्रम होण्या करिता विषेश सहकार्य शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी जाधव मॅडम यांनी केले.



