
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १३ मे २०२५ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध जयंती महोत्सव समिती गांधीनगर पिंपरी यांच्या वतीने सोमवार दि. १२/०५/२०२५ रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथम सत्रामध्ये सकाळी १०:३० वाजता पिंपरी येथील भीमसृष्टी मधे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्रफुल पौराणिक व पी एस आय संजय कांबळे आणि जयंती नियोजन समिती मधील सदस्य उपस्थित होते.
सकाळी ११:०० वाजता सुमेध बुद्ध विहार गांधीनगर येथे बुद्ध वंदना सुत्तपठन गांधीनगर मधील उपासकांच्या उपस्थितीत घेण्यात आले.
सायंकाळी ०६:०० वाजता तथागत भगवान बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये विशेष आकर्षण माता रमाई लेझीम संघ व दिया स्ट्रीट डान्सर ग्रुप डान्स यांचा सहभाग होता व समस्त गांधीनगर मधील नागरिकांनी या कार्यक्रमात उस्फूर्त असा प्रतिसाद दिला. पिंपरी चिंचवड शहरातील विविधक्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच पोलीस प्रशासनाने मिरवणुकीस योग्य अशी सुरक्षा देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत केली हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गांधीनगर मधील नागरिकांनी तन मन आणि धनाने सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल गांधीनगर मधील सर्व नागरिकांचे खूप खूप स्वागत..



