गून्हामहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्याहत्येचा कट रचणार्‍या तिघांना अटक, एक पिस्तुल जप्त..

प्रतिनिधी पिंपरी, दि. २८ आरोपी किशोर बापू भोसले (वय31 रा. पुनावळे), अमित दत्तात्रय पाटुळे (वय २३ रा. शिंदेवस्ती चौक, रावेत) आणि अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले (वय ३४ रा. पुनावळे) या तिघा अरोपींना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाकडून १ पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली.
पोलीस नाईक आशिष बोटके व प्रदीप गोडांबे यांना बातमी मिळाली की सराईत गुन्हेगार किशोर भोसले व अमित पाटुळे हे कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने, पुनावळे येथील स्मशान भुमी येथे येणार असून, त्यांचेकडे पिस्टल आहे, अशी बातमी मिळाल्याने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून वरील तिघा अरोपींना अटक केली. त्याचे विरुध्द रावेत पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर २६८ / २०२३, आर्म ॲक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास दरम्यान त्यांनी सदरचे पिस्टल व राऊंड हे अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले रा. पुनावळे, गावठाण, पुणे याचे सांगणेवरुन, तडीपार आरोपी रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार याचेकडून आणले असल्याचे सांगितले. सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे स.पो.नि. उध्दव खाडे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, मा. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, मा. सतिश माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, अशोक दुधवणे, अमर राऊत तसेच खंडणी विरोधी पथकाचे प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, रमेश मावसकर, किरण काटकर, सुनिल कानगुडे, प्रदीप गायकवाड, रमेश गायकवाड, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुधीर डोळस यांचे पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!