पिंपरी चिंचवड मधील पादचारी मार्ग (फूटपाथ) कधी घेतील मोकळा श्वास.. देवेंद्र तायडे

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड मधे सरकारला अपेक्षित असलेला स्मार्टसिटी अंतर्गत उपक्रम प्रशासकांनी गाजावाजा करत सूरू केला बर्याच ठीकाणी तो पूर्ण झाला देखील, पण यात दूहेरी फूटपाथ बनवले गेले त्यामूळे वाहतूकीचा रस्ता (मार्ग) अरूंद झाला. वाहतूकीला अडथळा वाढला मात्र पादचारी मार्ग (फूटपाथ) दूहेरी केले दोन वेगवेगळ्या कामा करीता, एक पार्किंगची समस्या दूर करण्या करीता व दूसरे सर्वसामान्यांना पायी चालण्या करीता पण हा पादचारी मार्ग (फूटपाथ) नेहमी प्रमाणे दूकानदार व्यापारी वर्गाने ताबा मारून आपला व्यवसाय दूकानाच्या बाहेर फूटपाथवर थाटला. आता हे पहावे लागेल की हे झोपलेले प्रशासन कधी लक्ष देणार या कडे की आंधळ्या कोशिंबीरीचा हा खेळ असाच सूरू राहणार. या खेळात हे पादचारी मार्ग (फूटपाथ) घेतील का कधी मोकळा श्वास ?…कधी करणार अतिक्रमण विभाग या (दूकान मालक) व्यापार्यांनवर कारवाई की फक्त गोरगरीब पथारी व्यसाईकांनवरच कारवाई करत राहणार ? या मोठ्या दूकान धारकांनवर कधी होणार कारवाई असे देवेंद्र तायडे यांनी प्रशासनास विचारले.



