उत्सवमहाराष्ट्रविशेषसामाजिक

इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी..

प्रतिनिधी गणेश धनवडे इंदापूर दि. ०२ जून २०२६ निमसाखर मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा अति उत्साहात साजरी करण्यात आली. या पौर्णिमेनिमित्त दत्त मंदिरामधून स्वामी समर्थांच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. पालखीचे चौका चौकात रांगोळी काढून महिलांनी स्वागत केले.पालखी मंदिरात आल्यानंतर ह.भ. प. श्री निवृत्ती उद्धव महाराज मरडे पंढरपूर यांचे स्वामी समर्थांच्या जीवनावर प्रवचन झाले त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती व जप घेण्यात आला सर्व जमलेल्या स्वामी भक्तांना श्री संतोष पांडुरंग माने घोरपडवाडी यांच्यातर्फे महाप्रसाद देण्यात आला. तसेच पालखीची सजावट श्री. राजेंद्र मारुती घोडे यांनी केली होती तसेच वालचंद नगरचे स्वामीभक्त श्री. राम कुंभार यांच्यातर्फे दत्त मंदिरामध्ये मनमोहक अशी रांगोळीची सेवा करण्यात आली. या कार्यक्रमाला निमसाखर गावांमधील सर्व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!