आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

हगवणे कूटूंबाला होता हूंड्याचा लळा ! महिला शिवसैनीकांना झाला संताप अनावर, म्हणून मारला घरावर शेणाचा गोळा !

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ मे २०२५ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला पिंपरी चिंचवड आघाडीच्या वतिने काल दुपारी महिला शिवसैनीकांनी भूकूम स्थित राजेंद्र हागावणेच्या घरावर शेण फेकत व घोषणा देत निषेध व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली आल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली हा निषेध करण्यात आला.
हागवणे कुटुंबाला या अशा गून्ह्याकरिता फक्त आणि फक्त फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी केली गेली, जेणेकरून समाजातील स्त्रिया पुन्हा हुंडा बळी आणि कौटूंबिक छळाला बळी पडून आत्महत्ये सारखे पाऊल उचलू नये.
अशा कृत्याची कोणतीही पुनरावृत्ती होवू नये. व पून्हा महिलांना आंदोलन करण्याची गरजच पडू नये असे यावेळी आल्हाट म्हणाल्या.
यावेळी प्लास्टिकच्या पिशवीतून जे शेण आणण्यात आले होते. त्याच शेणाचे गोळे करून घरावर फेकत निषेध व्यक्त करण्यात आला.
या घटनेत हागावणे कुटुंबातील सासरे, नवरा, सासू ननंद, दिर असे सर्व पोलिसांनी अटक करून २८ मे पर्यंत पोलिसांनी रिमांड मधे घेतले आहे. फरार असणारे वडिल व मूलगा यांना आश्रय देणार्‍या ०५ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.
तसेच वैष्णवीच्या ९ महिन्याच्या बाळाला लपवून ठेवणार्‍या चव्हाण नावाच्या इसमाला फरार असल्याने पोलिस गजाआड करू शकले नाहित.
आतापर्यंत पीडितेचे कुटुंबास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, काॅंग्रेसचे विजय वडेट्टीवार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ, खासदार श्रीरंग बारणे, आंबादास दानवे यांच्यासह अनेक आमदार, खासदार नेते मा. नगरसेवक कार्यकर्ते भेटून गेले.
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजपर्यंत शहर भाजपा आणि समर्पित तीन आमदार कस्पटे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आले नाहीत. परंतु आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर अध्यक्षा आल्हाट यांनी आरोपी हागावणे कुटुंबाच्या घरावर गायीच्या शेणाने हल्ला करून स्वतंत्र चळवळ उभी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!