अभिवादनदेश-विदेशपिंपरी चिंचवड मनपा.महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

त्याग मूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ मे २०२५ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने ऐतिहासिक भीमसृष्टी स्मारक पिंपरी या ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
यावेळी त्याग मूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेस व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास प्रफुल पूराणिक जनसंपर्क अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पॅंथर बाळासाहेब रोकडे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बौद्धाचार्य बापूसाहेब गायकवाड त्यांच्या वतीने सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले व उपस्थित सर्व सदस्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी मा प्रफुल पूराणिक जनसंपर्क अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, संजय कांबळे पीएसआय, बाळासाहेब रोकडे, बापूसाहेब गायकवाड, दत्ता ठाणांबिर, मनोज गजभार, संतोष जोगदंड, अभिजीत डोळस, राम भंडारे, रवी कांबळे, बाबासाहेब वाघमारे, सुभाष जाधव, मुकेश जगताप, पप्पू खरात, प्रमोद शेरे, महायान मसुरे इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!