महाराष्ट्रविशेष
वाहन निरीक्षकपदी निकिता खंडीझोड

चांदेकसारे : (प्रतिनिधी अजय विघे) कोपरगाव तालुक्यातील वेस येथील निकिता सुरेश खंडीझोड यांची सहायक मोटार निरीक्षक पदी निवड झाली.
निकिता हिचे शालेय शिक्षण डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्या मंदिर कोपरगाव येथे झाले. तसेच बी.ई. मेकॅनिकल पदवी संजीवनी इंजिनियरिंग कॉलेज कोपरगाव येथे पूर्ण केले. एमपीएसी परीक्षेद्वारे सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. या यशाबद्दल निकिताचे कोपरगाव तालुक्यातून कौतुक होत आहे.



