शहाजीराजांच्या संकल्पनेतून जिजाऊंच्या मार्गदर्शनाने छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्वराज्य निर्माण केले: प्रकाश जाधव.

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनी कार्यक्रमाचे आयोजन..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ जून २०२५ रयतेच्या स्वराज्य निर्मितीचा शहाजी राजांनी संकल्प केला. राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाने छत्रपती शिवाजी राजांनी पूर्ण केला. दि. ०६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर जिजाऊंच्या उपस्थितीत राज्याभिषेक करून शिवाजी राजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले छत्रपती शिवाजीमहाराज राजे झाले असे प्रतिपादन मराठा सेवा संघ शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले. भक्ती शक्ती समूह शिल्प निगडी येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे जिल्हाध्यक्षा मनिषा हेंबाडे शहराध्यक्षा सुलभा यादव सचिव वृषाली साठे यांच्या हस्ते भक्ती शक्ती समूह शिल्पास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजीमहाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, वसंतराव पाटील, दिलीप गावडे, अशोक सातपुते, सयाजी भांदिगरे, धन्यकुमार जगदाळे, मंगेश चव्हाण, जिजाऊ ब्रिगेडच्या रत्न प्रभा सातपुते, जयंती कदम, कौशल्या जाधव, संध्या भालेराव, वंदना क्षीरसागर, शितल भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, विवेक गायकवाड, साहेबराव साळुंखे, शाम पाटील, राजेश सातपुते, नितिन विधाते यांनी विशेष परिश्रम घेतले. मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. आजही छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या चरित्रातून महिलांशी कसे वागावे, स्वावलंबी कसे बनावे नियोजन व्यवस्थापन कसे करावे याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन आबासाहेब ढवळे यांनी मनोगतात व्यक्त केले सूत्रसंचालन दिलीप गावडे यांनी केले तर आभार प्रविण कदम यांनी मानले.



