मेघराज लोखंडे यांच्या प्रयत्नांना यश नवी सांगवी पोलीस चौकीचे दुरुस्तीचे काम झाले सूरू..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०६ जून २०२५ पावसाळा सुरू झाल्यापासून ( नवी सांगवी पोलीस चौकी पिंपळे गुरव डायनासोर गार्डन येथे ) रस्त्यावर भरपूर प्रमाणात पाणीसाठा होत होता. त्यामुळे पोलीस चौकीमध्ये तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना व पोलीस बांधवांना याचा त्रास वारंवार सहन करावा लागत होता. त्यामूळे त्रस्त नागरिकांनी मेघराज लोखंडे चिंचवड विधानसभा अध्यक्ष ( राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार ) यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सदर कामाची पाहणी करून मेघराज लोखंडे यांनी दि. २९ मे २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत सदर कामाला लवकर सुरुवात करा असं देखील सांगितले होते. सांगितल्याप्रमाणे काल मेघराज लोखंडे चिंचवड विधानसभा अध्यक्ष ( राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार ) यांच्या हस्ते सदर कामाचा नारळ फोडून कामाला सुरुवात करण्यात आली असून त्या ठिकाणी नवीन पेविंग ब्लॉक, नवीन पाच हजार लिटर थंड पाण्याची टाकीचे कनेक्शन तसेच सिमेंट काॅंक्रीटं कोब्याचे इतर कामे करून देण्यात येणार आहे व या आधी दिखील मेघराज लोखंडे यांनी पोलीस चौकीतील बंद असलेले स्ट्रीट लॅम्प चालू करून देणे, डासोत्पत्ती होऊ शकणाऱ्या ठिकाणी अळीनाशक औषध फवारणी तसेच अस्वच्छता असलेल्या ठिकाणी साफसफाईचे काम करून घेतलेले आहे.
सदर काम हे एक आठवड्यात पूर्ण होईल असे संबंधीत अधिकार्याने यावेळी सांगीतले. या संदर्भात या आधी देखील मेघराज लोखंडे यांच्याकडून महापलिका अधिकाऱ्यांची कान उघडणी केली होती की महापलिका प्रशासनाचे पोलिस चौकी कडे दुर्लक्ष होत आहे.
या चौकीच्या दुरुस्ती कामानंतर पोलीस बांधवांना व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.
यावेळी अवधूत कदम, गौरव जगताप, चैतन्य जाधव, जॉय चोपडे, आर्यन मसुरे व पक्षाचे इतर ही पदाधिकारी उपस्थित होते.



