कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल खडकी या शाळेला कसलाही परवाना नसताना देखिल सूरू असलेल्या या शाळेवर त्वरित कारवाई करावी- फेरोज खान

प्रतिनिधी खडकी पूणे दि. १५ जून २०२५ रिपब्लिकन मायनॉरिटीज फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष- फेरोज खान यांनी निवेदनातून जनतेसमोर एक गंभीर विषय मांडला आहे. या निवेदनात खान म्हणतात की खडकी येथील कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल ही शाळा बेकायदेशीररीत्या चालवली जात असून, शासनाची कोणतीही मान्यता किंवा नोंदणी नसताना देखील ही शाळा राजरोस पणे सूरू आहे. शिक्षणधिकारी सौ. रंजनाताई कड यांनी दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी या शाळेची पाहणी करून ती बेकायदेशीर असल्याने त्वरित बंद करत असल्याचे जाहीर केले होते.
तरीही आज या शाळेत नविन विद्यार्थ्यांना प्रवेश देवून शैक्षणिक प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे पालकांची फसवणूक होत असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सूरू आहे.
यात काही अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय असून या बेकायदेशीर कृत्याला पाठबळ दिले जात असल्याचे स्पष्ट दिसते आहे असे खान यांनी निवेदनात नमूद केले आहे.
म्हणून रिपब्लिकन मायनॉरिटीज फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष- फेरोज खान यांनी खालील मागण्या केल्या आहेत.
०१. कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलवर त्वरित कठोर कारवाई करावी.
०२. संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.
०३. या शाळेतील संपूर्ण शैक्षणिक प्रक्रिया शिक्षणाधिकार्यांनी जर थांबली नाही, तसेच या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर आम्ही शांततामय पद्धतीने बेमुदत आंदोलन करणार असून, यामध्ये जिल्हा परिषद व शासनाविरुद्ध निषेध नोंदवला जाईल असे फेरोज खान यांनी निवेदनाद्वारे सांगीतले
.



