अपघातआर्थिककलामहाराष्ट्रमूंबईविशेषसामाजिक

मूंबई गोरेगाव फिल्मसिटीत अग्नितांडव..

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुंबई दि. २४ जून २०२५ मुंबई मधील गोरेगाव फिल्मसिटीतील ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटला भीषण आग लागली आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दल तात्काळ दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक झाल्याने निर्मात्याचे मोठं नुकसान झाले आहे…
सुदैवाने, या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही किंवा जीवितहानी झाली नाही. पहाटे पाच वाजल्यापासूनच गोरेगावमधील फिल्मसीटीमधून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसू लागले. आग इतक्या झपाट्याने पसरली की, अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण सेट खाक झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन दलाचे अधिकारी करत आहेत…
सकाळी सात वाजता चित्रीकरण सुरू होण्याच्या नियोजित वेळेच्या फक्त दोन तास आधी, आगीने सेट पूर्णपणे जळून खाक झाला. आग लागली तेव्हां दिवसाच्या चित्रीकरणाची तयारी आधीच सुरू होती. घटनेच्या वेळी, अनेक कामगार आणि क्रू मेंबर्स सेटवर उपस्थित होते. सुदैवाने, अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!