ख्रिश्चन समुदायाच्या वतीने सांगलीत जनआक्रोश आंदोलन.- राजन नायर

सामाजिक कार्यकर्ते राजन नायर हे गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यावर ठाम..
प्रतिनिधी सांगली दि. २७ जून २०२५ काल दि. २६ रोजी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरू विरूध्द केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल आणि त्यांना जिवे मारण्याची सुपारी दिल्याबद्दल त्यांच्या अटकेसाठी आणि विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी ख्रिश्चन समुदायाने सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन आयोजित केले होते.
गेल्या आठवड्यात सांगलीतील एका गर्भवती महिलेने आत्महत्या केल्यामुळे, भाजप आमदार पडळकर यांनी धर्मांतरण प्रकरण म्हणून लोकांना भडकावले आणि ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्यासाठी ११ लाख रुपयांची सुपारी दिली.
भारतीय संविधानाच्या कलम २५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीयांना धर्म बदलण्याचा किंवा स्वीकारण्याचा अधिकार दिला आहे, परंतु आमदार पडळकर यांनी या कलमाला विरोध केला आहे, समाजात बंधुत्वा विरुद्ध लढा देण्याबद्दल आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याबद्दल व्यक्तत्व केले आहे. या गोष्टींच्या भीतीने महाराष्ट्रातील संपूर्ण ख्रिश्चन समुदायात असंतोषाचे वातावरण निर्माण आहे आणि त्यामुळे ख्रिश्चन समुदायाचे लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांनी सार्वजनिक जन आक्रोश आंदोलन केले आहे.
याप्रसंगी, सामाजिक कार्यकर्ते आणि ख्रिश्चन समुदायाचे धडाडीचे नेते श्री. राजन नायर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रत्येकाला आपल्या हक्कांसाठी लढण्याचा अधिकार आहे, आपण या परिस्थितीला न घाबरता एकजुटीने तोंड देऊ आणि जोपर्यंत महाराष्ट्र सरकार आणि पोलीस प्रशासन पडळकर यांच्या विधानावर योग्य कारवाई आणि अटक करत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ख्रिश्चन समुदाय निषेध करत राहील. जर योग्य कारवाई केली गेली नाही तर समुदाय पावसाळी अधिवेशनात विधानसभेला घेराव घालेल.
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, सर्वांना धर्म स्वातंत्र्य आहे. हिंसाचार भडकवणारा, धमक्या देणारा, धर्मगुरूंना जीवे मारण्याची सुपारी देणारा हा आमदार याला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आण्णाभाऊ साठे अशा महामानवांच्या महाराष्ट्रात आमदारपद भूषवण्याचा अधिकार नाही.
आमदार पडळकर यांच्या अशा वादग्रस्त विधानामुळे मुंबई, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, सांगली आणि महाराष्ट्रातील अशा अनेक ठिकाणी जनआक्रोश आंदोलने आयोजित करण्यात आली आहेत आणि पूढे ही सुरू राहतील.
राजन नायर यांच्या भाषणात, त्यांनी महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संघटना आणि पदाधिकाऱ्यांना थेट सभेला येऊन व सोशल मीडियाद्वारे पाठिंबा देणारे आंबेडकर चळवळीतील दीपक केदार, रिपब्लिकन पार्टी इंडिया आठवले गट, सचिन खरात गट, वंचित बहुजन आघाडी, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, पास्टर विजय वायदंडे, पास्टर सचिन जाधव, पास्टर सुनील मगधूम, पास्टर पिंटू. भोरे, पास्टर मनोज रणधीर, पास्टर रवी मगधूम, पास्टर पांडुरंग वाघमारे, पास्टर जनार्दन वाघमारे, पास्टर संजय पाटील, इलिया माने, पास्टर आमोस मोरे, पास्टर प्रसन्न काळे, वंदना चदनशिव अल्पसंख्याक सांगली जिल्हाध्यक्ष, शाकीर तांबोळी, गॅब्रियल तिवडे, अकादमी तिवडे, जे. आदाटे, सुधाकर गायकवाड, मनोज मोरे, प्रा. सुकुमार कांबळे आंबेडकरी नेते, नाईकवडे आमदार, तानाजी सावंत मनसे अध्यक्ष सांगली, आणि अजित सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते या सर्वांचे मनःपूर्वक आभार नायर यांनी व्यक्त केले.



