यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील तातडीक विभागातील रुग्ण उपचाराविना बेवारस..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०५ जूलै २०२५ यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील तातडीक विभागातील (वार्ड नं. ५०) रुग्णावर ३/३ तास उपचार न करता, नातेवाईकांची हेळसांड व हुज्जत घातली जाते या बाबत आरोग्य अधीकार्यांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात म्हणून राष्ट्रवादी रिपब्लिकन पक्षाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी निवेदन दिले आहे.
या निवेदनात ते म्हणतात की, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पिंपरी येथील तातडीक विभागातील (वार्ड नं. ५०) रुग्णांवर वेळेवर उपचार न करता ३/३ तास विलंब लावला जात आहे. तसेच रुग्णांचे नातेवाईकांनी या संदर्भात विचारले तर यांच्याशी हुज्जत घालून त्यांची हेळसांड केली जात आहात. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
सदर प्रकारांमुळे रुग्णांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असून रुग्णालय प्रशासनाने या संदर्भात तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच, संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी, जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडू नयेत अन्यथा आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल. असे त्यांनी यावेळी सांगीतले.
पूढे ते म्हणाले राष्ट्रवादी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही रुग्णाची बाजू घेऊन त्यांचेवर त्वरित उपचार करणे बाबत संबंधित डॉक्टरांना बोललो असता त्यांनी पोलिसांना पाचारण करून आमचेवरच सरकारी कामात अडथळा आणल्या बाबत गुन्हा दाखल करण्याचे धमकी दिली. तर डाॅक्टर सर्वसामान्य जनतेला कीती छळत असतील याची कल्पना करवत नाही. याच मूळे आपणांस विनंती करण्यात येते कि, वरील प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी व योग्य ती कार्यवाही करावी. अशी विनंती राष्ट्रवादी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या निवेदना द्वारे करण्यात आली.




