नामदेवाची मॅनेजमेंट तलवारीच्या धारेवर… चौकशी कोण करणार युवराज दाखले यांचा घणाघात..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड, दि. ०९ मे २०२६ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आवारात उभ्या असलेल्या MH14HK8074 क्रमांकाच्या “शिवाजी द मॅनेजमेंट गुरु” लिहिलेल्या इनोव्हा गाडीच्या डॅशबोर्डवर उघडी तलवार ठेवल्याचा धक्कादायक फोटो समोर आला आहे. “नामदेवाची मॅनेजमेंट तलवारीच्या धारेवर चालते, याचा पुरावाच मिळाला,” असा थेट आरोप हिंदू मातंग सेनेचे मुख्य प्रवक्ते तथा कार्यकारी प्रमुख युवराज दाखले यांनी केला आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला भक्ती, प्रेम व अहिंसेचा संदेश दिला. त्यांच्या नावाने चालणाऱ्या संस्थेची गाडी जर तलवार मिरवत असेल, तर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची पायमल्ली आहे. छत्रपतींची तलवार स्वराज्यासाठी होती, पण ही तलवार कोणाला घाबरवण्यासाठी?” असा सवाल युवराज दाखले यांनी केला.
गंभीर बाबी:
१. शासकीय आवारात उघडे शस्त्र – शस्त्र कायदा, 1959 चे उल्लंघन.
युवराज दाखले यांच्या मागण्या:
१. PCMC पोलीस आयुक्तांनी २४ तासात MH14HK8074 गाडी जप्त करावी व चालक-मालकावर गुन्हा दाखल करावा.
२. “शिवाजी” नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करावी.
३. PCMC आयुक्तांनी शासकीय आवारात शस्त्र आणणाऱ्यांना कायमची बंदी घालावी.
पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्यास शिवशाही व्यापारी संघ व हिंदू मातंग सेना PCMC वर धडक मोर्चा काढेल,” असा इशारा युवराज दाखले यांनी यावेळी दिला आहे.



