
भिमशक्ती सामाजिक संघटना, पिंपरी चिंचवड शहर आयोजित लोकशाहीर वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ‘लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा व प्रबोधनात्मक शाहिरी जलसा
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड, दि. २४ ऑगस्ट २०२५
बहुजनांच्या न्याय, हक्क आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी कार्यरत भिमशक्ती सामाजिक संघटना, पिंपरी चिंचवड शहर तर्फे लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा व प्रबोधनात्मक शाहिरी जलसा भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटक राज्यसभा खासदार माजी सामाजिक न्यायमंत्री मा. चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या हस्ते होणार आहे. व प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रज्योतीताई चंद्रकांत हंडोरे (युवा नेत्या, भिमशक्ती संघटना – महाराष्ट्र प्रदेश) उपस्थित राहणार असून, विशेष प्रमुख पाहुणे म्हणून मा. विशालजी लोंढे (सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे) उपस्थित राहतील.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. सुरज गायकवाड (अध्यक्ष – भिमशक्ती संघटना, पिंपरी चिंचवड शहर) मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रम वैशिष्ट्ये:
१) ‘लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार’ वितरण.
२) फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील कलाकारांचा सत्कार
३) फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा गौरव
४) कलावंतांचा गुणगौरव
५) प्रबोधनात्मक शाहिरी सादरीकरण.
६) स्थानिक कलावंतांचा उत्स्फूर्त सहभाग
लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार २०२५ – पुरस्कारार्थी:
मा. विशाल ओव्हाळ
मा. भारत बाबू लोणारे
मा. संकल्प गोळे
मा. साधना मेश्राम
मा. डॉ. प्रज्ञा इंगळे
मा. धीरज वानखेडे
मा. स्वप्नील पवार
मा. गजलकार अशोक गायकवाड
मा. मुन्ना भालेराव
मा. संतोष कांबळे
मा. सुनील गायकवाड
मा. संजना डोळस
मा. शीला साबळे
मा. गौतम कांबळे
मा. वैशाली नगराळे
मा. कैलास शिंदे
मा. एस. आर. किनीकर
मा. कवी गोविंद दादा गाडे
मा. राहुल सूर्यवंशी (तबला वादक)
मा. संगीता भंडारी
मा. सागर यल्लाळे
मा. नागोराव लाव्हरे (नांदेडकर)
कार्यक्रम तपशील:
दिनांक: सोमवार, २५ ऑगस्ट २०२५
वेळ: सायंकाळी ५:२५ वा.
स्थळ: सावित्रीबाई फुले सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरी, पुणे
सूत्रसंचालन: प्रा. युवराज भास्कर टिकटे सर
प्रास्ताविक :- विजय हिंगे (पुणे शहराध्यक्ष, भिमशक्ती संघटना) भिमशक्ती सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांना, समाजबंधूंना व सर्व कार्यकर्त्यांना या भव्य सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन केले आहे.



