गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेष

रावणवाडी हद्दीतील नागरिकांचे हरविलेल्या मोबाईलचा तांत्रीक पध्दतीने शोध घेवून १५ महागडे मोबाईल किंमत १,५०,००० रूपयांचे मुळ मालकांना केले परत..

प्रतिनिधी गोंदिया दि. १७ ऑगस्ट २०२५ याबाबत थोडक्यांत माहिती अशी की, रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे वेगवेगळया ठिकाणाहुन वेगवेगळे कंपनीचे महागडे मोबाईल हँडसेट हरविल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यास प्राप्त झालेल्या होत्या…. सदर तक्रारीचे अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे रावणवाडी पोलीस ठाणेचे ठाणेदार वैभव पवार, पोलीस निरीक्षक यांनी गंभीर दखल घेवून त्यांच्या अधिनस्त पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन करुन हरविलेल्या मोबाईलचे शास्त्रोक्त पध्दतीने शोध घेण्याबाबत आदेशीत केले होते..
या अनुषंगाने पोलीस ठाणे रावणवाडी येथील पोलीस पथक यांनी हरविलेल्या मोबाईलचे केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर (CEIR) या अप्लीकेशन वर हरविलेले मोबाईलचे अर्ज अपलोड करुन पथकाने रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतुन वेगवेगळ्या कंपनीचे हरविलेले एकुण १५ महागडे मोबाईल शास्त्रोक्त तंत्रशुद्ध पध्दत व बुध्दीकौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफीने शोधुन काढले. सदरचे मोबाईल काल दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी वैभव पवार, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे रावणवाडी यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगीरी पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया, अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया रोहिणी बानकर, पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस निरीक्षक सायबर सेल, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रावणवाडीचे पो.नि. वैभव पवार, पो.शि. रजनिकांत बोपचे, तसेच तांत्रीक सेलचे रोशन येरणे, योगेश रहिले यांनी सदरची कामगिरी केली आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!