गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

गुन्हे शाखेचा वाघोली भागात छापा कारवाई करुन किंमत रु. ७६,०१,७१०/- चा ३५१ ग्रॅम ५०२ मि.ग्रॅ. चा मॅफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त..

प्रतिनिधी पूणे दि. १७ ऑगस्ट २०२५ परवा दि. १५/०८/२०२५ रोजी वरिष्ठांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत तांबे वस्ती, गुलमोहर पार्कचे मागे बकोरी, वाघोली पुणे येथे सार्वजनीक ठिकाणी आरोपी नामे १) रामेश्वरलाल मोतीजी आहिर, वय ४५ वर्षे, रा. अहिर मोहल्ला, पोस्ट लोठीयाना, गांव चक्रतीय, जिल्हा चित्तोडगड राज्य राजस्थान २) नक्षत्र हेमराज अहिर, वय २५ वर्षे रा. अहिर मोहल्ला, पोस्ट लोठीयाना, गांव चक्रतीय, जिल्हा चित्तोडगड राज्य राजस्थान यांच्या ताब्यात एकूण ७६,०१,७१०/-रू कि. चा ऐवज त्यामध्ये ३५१ ग्रॅम ५०२ मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ तसेच इतर ऎवज जप्त करुन त्यांचे विरुध्द वाघोली पोलीस स्टेशन गुन्हा रजि. ४२०/२०२५, एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८(क), २१ (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, मा. सह. पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सपोनि नितीनकुमार नाईक, सपोनि राकेश कदम, सपोनि मदन कांबळे, व पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे, प्रशांत बोमांदंडी, संदिप शेळके, संदिप जाधव, नितीन जगदाळे, दिनेश बास्टेवाड, सारंग दळे, प्रशांत कापुरे, गिरीश नाणेकर, सचिन पवार, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश व्यवहारे, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!