आंदोलनआरोग्यमहाराष्ट्रविशेषशैक्षणिक

गावाला रस्ता नाही म्हणून महीला सरपंचांची गाडी अडवून शाळेतील मुलांनी चिखलफेक करत जाब विचारला..

पाथर्डी तालुका अहिल्यानगर या गावाचा रस्ता कधी होणार! गावकरी ५० वर्षापासून वंचित..

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुबंई (शेगाव पाथर्डी) दि. १८ ऑगस्ट २०२५ अनेक वर्ष ही शाळेतील मुल चिखल तुडवत शाळेत जात आहेत. एकी कडे सरकार मोठा डंका वाजवण्यात येतो अमुकतमुक रस्ता, महामार्ग बनवून कमी वेळात इच्छित स्थळी पोहोचणार असा विकास व स्मार्ट सिटी, अमुक एक विमान तळ बनवायचे नेते भाषण ठोकून मोकळे होतात पण प्रत्यक्षात काय अवस्था आहे याचे गांभीर्य कधी सरकार घेणार का ?
अशा प्रश्नांना जनता सुद्धा जबाबदार आहे. अनेक छोट्या छोट्या गावांची ही समस्या आहे. सर्वांनी एकत्रित येऊन पूर्णपणे मतदानावर बहिष्कार घातला पाहिजे परंतु गावात गट तट, अनेक पक्ष यामुळे लोक एकत्र येत नाहीत आणि समस्याही सुटत नाहीत. आमदार खासदारांना गावातच येऊ द्यायचे नाही. तहसीलदाराला निवेदन देऊन मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घालायचा सगळे सरळ होतील परंतु स्वातंत्र्य आले आणि गटातटात गाव विभागले गेले आणि छोट्या छोट्या गावांचे प्रश्न सुटेनासे झाले. हल्ली लोकांना रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत प्रश्नांपेक्षा मोफत तीर्थयात्रा लाडकी बहिन योजना या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात आणि यामध्येच लोकप्रतिनिधी जनतेला अडकवून ठेवतात. जाती-जातीचे पुढारी त्यांनी शोधले आहेत तेवढे पुढारी हाताशी धरले म्हणजे त्यांना एक गठ्ठा मतदान होते. मूलभूत प्रश्नांचे त्यांना काही सोइर सुतक नाही आणि जनता ही भोळीभाबडी आहे. त्यांना अशा गोष्टी दिल्या की ते शांत बसतात. आता तर हजारो सरकारी शाळा त्यांनी बंद केल्या गेल्या आहेत आणि नविन दारूचे परवाने दिले जात आहेत. स्पष्ट आहे लोक शिक्षित झाले म्हणजे प्रश्न विचारतात. म्हणूनच कावड यात्रेसारखे धार्मिक कार्यक्रमाला प्रोत्साहन द्यायचे त्यांच्यावर फुले उधळायची आणि शाळा बंद करायच्या… वारे मायबाप सरकार… गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे.
या बाबतीत पुर्ण विडिओ सद्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
पण या सर्वावर मात करत या शाळकरी चमूने सरळ सरळ गावच्या सरपंचालाच गाडीतून जाताना गाडीवर रस्त्यावरील चिखल फेकून निषेध व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!