अभिवादनउत्सवमहाराष्ट्रमूंबईसामाजिक

शिवसेना शाखा १०८च्यावतिने १५ ऑगस्ट निमित्ताने मंगळागौर सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुबंई दि. १७ ऑगस्ट २०२५ उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या मार्गदर्शनाने मुलुंड शाखा १०८ च्या वतीने शाखाप्रमुख शैलेश धर्मराज पवार आयोजित सर्व शिवसैनिक पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थित ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाखा १०८ चे शाखा प्रमुख शैलेश पवार यांच्या वतिने अनेक उपक्रम राबविण्यात येतात. या पैकी मंगळागौर महिलांच्या आवडीचा यात अनेक महीला उत्साहात सहभागी होवून यथेच्च भाग घेऊन झिम्मा फुगडी, फेर धरून गाणी व उखाणे बोलून कार्यक्रमाचा लाभ घेतात. सर्व महीला मराठमोळा नववारी पेहरावात उपस्थित राहतात. हा कार्यक्रम राबविण्यासाठी महीला वर्गाचा मोलाचा वाटा असतो.
या वर्षी कार्यक्रम लायन्स क्लब मुलुंड (प.) येथील हाॅल मध्ये संपन्न झाला. मुलुंड पश्चिमेतील इंदिरा नगर नं.३ येथे ह्या वर्षी प्रथमच दही हंडी फोडायला निघणाऱ्या श्रीसाई गोविंदा पथकाला शाखाप्रमुख शैलेश पवार यांनी श्रीफळ वाढवून हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी तेथील बालगोपाल गोविंदाचा उत्साह व जिद्द पाहून शाखाप्रमुख शैलेश पवार यांनी मुलुंड मधील विविध गोविंदा मंडळांच्या दहीहंडी फोडण्यासाठी निघालेल्या श्रीसाई गोविंदा पथकाला टेम्पो अल्पोहार व पाण्याची सोय करून दिली आहे. यावेळी उपशाखाप्रमुख स्वप्निल सूर्यवंशी, प्रविण पराडकर, मुलुंड शाखा १०८चे सर्व पदाधीकारी, कार्यकर्ते व असंख्य मुलुंडकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!