गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहर

डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर सायबर पथकाने गहाळ झालेले ४,५०,०००/- रु. किमतीचे २६ मोबाईल केले हस्तगत..

प्रतिनिधी पूणे दि. २२ ऑगस्ट २०२५ केंद्र शासनाच्या दुरसंचार विभागाद्वारे हरवलेल्या/चोरीस गेलेल्या मोबाईलची माहीती मिळवणे संदर्भात (Central Equipment Identiy Register – CEIR) ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या CEIR प्रणालीचा वापर करुन डेक्कन पोलीस ठाणेकडील सायबर विभागाचे प्रमुख वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती गिरीषा निंबाळकर, महिला पोलीस अंमलदार उमा पालवे यांनी डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत हरविलेल्या मोबाईलचा डेटा तयार करुन, त्याबाबत तांत्रिक तपास करुन त्यांचा वारंवार पाठपुरावा करुन हरवलेले मोबाईल फोन हे महाराष्ट्रतील विविध जिल्हयात व तसेच इतर राज्यात वापरत असल्याचे निदर्शनास आले. सदरचे मोबाईल फोन वापरकर्त्याशी संबंधित पोलीस ठाणेस संवाद साधुन हरवलेले एकुण ४,५०,०००/-रु. कि.चे एकुण २६ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबंधित तक्रारदार यांना डेक्कन पोलीस स्टेशन कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांचे हस्ते परत करण्यात आले.
मोबाईल हरवल्याचे तक्रार तात्काळ ऑनलाईन पुणे पोलीसांचे punepolice.gov.in/lost Found Reg. या वेबसाईटला प्रथम तक्रार नोंद करावी. नोंद करताना जवळचे पोलीस स्टेशनचे नाव त्यात सिलेक्ट करावे व आपले जवळच्या पोलीस स्टेशनला जावुन त्यांची एक कॉपी द्यावी, त्यानंतर हरवलेले मोबाईल मधील त्याच नंबरचे नविन सिमकार्ड घेवुन ते चालु करुन घेतल्यानंतर शासनाचे https://www.ceir.gov.in (CEIR) या पोर्टलवर नोंद करुन त्यांचा रिक्वेस्ट आयडी संबंधित पोलीस स्टेशनला आणुन देणे.
सदरची कामगिरी ही मा अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर राजेश बनसोडे, मा.पोलीस उप-आयुक्त, परि-१ कृषिकेष रावले, यांचे मागदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग पुणे साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन पोलीस स्टेशन श्रीमती गिरिषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांचे सुचना प्रमाणे सायबर पथकाचे पोलीस महिला पोलीस अंमलदार उमा पालवे, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!