गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेष

“३,००,०००/- रुपये रोख रक्कम राहुरी पोलीस स्टेशन कडुन फिर्यादीस परत”

प्रतिनिधी अहिल्यानगर दि. २२ ऑगस्ट २०२५ मा.पोलीस अधीक्षक अहिल्यानगर , मा.अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि.अहिल्यानगर यांचे आदेशान्वये राहुरी पोलीस स्टेशन येथे दाखल होणारे गुन्हयांचा तपास करुन जप्त मुददेमाल फिर्यादीस परत देण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.
दि. ३०/१२/२४ रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १३१३/२०२४ भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस) २०२३ चे कलम ३०९(६) , ३१०(२)(४) प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचा तपासामध्ये राहुरी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा जि. अहिल्यानगर या संयुक्त पथकाने गुन्हयाचा तांत्रीक पुराव्याचे आधारे सखोल तपास करुन गुन्हयामध्ये आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत व आरोपींकडुन फिर्यादी यांचे ३,००,००० /- रुपये रोख रक्कम २००, १०० दराच्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट राहुरी यांच्या आदेशान्वये सदर रोख रक्कम फिर्यादी यांचे ताब्यात देण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी मा. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहिल्यानगर, मा. जयदत्त भवर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर जि. अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली , पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , पो.हे.काँ. विकास साळवे, म. पो. हे काँ. कोहोकडे , पो. काँ.आजीनाथ पाखरे यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!