घातक शस्त्रांनिशी जबरी चोरी करणारी टोळी राहुरी पोलीसांनी केली जेरबंद..

प्रतिनिधी राहुरी दि. २२ ऑगस्ट २०२५ राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये देवळाली प्रवरा येथील शेतकरी शंकर नारायण देशमुख यांच्या वाड्यातील दोन बकऱ्या घातक शास्त्रानिशी दरोड्याच्या तयारीने येऊन चोरांनी आणलेल्या कार गाडीत सदर बकऱ्या चोरून नेल्याबाबत भारतीय न्याय संहिता कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर चोरलेल्या बकऱ्या घेऊन जात असताना फॅक्टरी येथे काही नागरिकांनी सदर चोरांना पकडले व राहुरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधला.
त्यावेळी असे लक्षात आले की देवळाली प्रवारा येथील चोरलेल्या बकऱ्याचे सदर चोर घेऊन जात होते.
त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना फोन केला. दरम्यानच्या काळात चोरी करणारे ०४ इसम सैरभैरहोवून पळून गेलेले होते.
ताब्यात घेतलेला इसम नामे सनी उर्फ कृष्णा मुकेश सूर्यवंशी यास राहुरी फॅक्टरी येथील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान उर्वरित आरोपी विशाल उर्फ पिण्या विष्णू बर्डे राहणार वाळूंज वस्ती, देवळाली प्रवरा, दादा राजू बर्डे राहणार देवळाली प्रवरा अनिल दत्तू पवार राहणार देवळाली प्रवरा अशा चौघांना राहुरी पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव व लेखनिक पोकॉ. गणेश लिपणे यांनी अटक करून त्यांना मा. न्यायालयापुढे पोलिस कस्टडी मिळणे कामी हजर करून सरकारी अभियोक्ता पाटील यांनी बाजू मांडल्याने अटक चारही आरोपींना पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी देवदत्त पवार, यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके, राहुल यादव, सुरज गायकवाड, विजय नवले, पो.ना. प्रवीण बागुल, पो.कॉ. गणेश लिपने, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे, सचिन ताजने, अंकुश भोसले, अंबादास गीते यांच्या पथकाने केली.



