गून्हानाशिकपोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

घोटी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, ०४ लाख २७ हजाराच्या मोटारसायकली हस्तगत..

प्रतिनिधी रेणूका गायकवाड-महाले नाशिक दि. ०५ सप्टेंबर २०२५ घोटी पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलीसांना मोठे यश मिळाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सागर मोहन माळी यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदारांसह मोटारसायकल चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या साथीदारांना अटक करून एकूण ८ मोटारसायकली (किंमत सुमारे ०४ लाख २७ हजाराच्या मोटारसायकली हस्तगत केल्या.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!