आरोग्यमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

भांडूप गावातील रस्त्याची अनेक वर्षापासून सततची दुर्दशा!

प्रतीनीधी सतिश वि.पाटील मुबंई दि. ०५ सप्टेंबर २०२५
गेल्या अनेक वर्षांपासून भांडूप गाव पुर्व महादेव दामोदर केणी मार्ग ते शिवाई शाळा, महापालिका शाळेच्या (मध्यभागी ) येथे पेवर ब्लाॅक टाकण्यात आले आहेत. पण ते आता ओबडधोबड व बरेच निघाले आहेत त्यामुळे रस्त्या खड्डेमय झाला असून पाणी साचून राहते वाहने व जनतेला या त्रासाला सामोरे जावे लागत आहे चिखलमय रस्त्यावर वाहनाची कोंडी होणे हे नित्याचेच झाले आहे. तरी सणासुदीच्या दिवसात ही येथील जनतेला या समस्येस सामोरे जावे लागत आहे. याबाबत भांडूप एस. विभागात सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र पवार यांनी अनेक वेळा ट्विट करून तक्रार दाखल केली आहे. तरीपण आज पर्यंत निश्काळजी सरकार या कडे कानाडोळा करत असल्याचे दिसते आहे. यावेळी तरी संबंधीत अधिकार्‍यांनी तक्रारीची दखल घेऊन त्वरित व योग्य असा मार्ग काढून भांडूपकर जनतेला दिलासा द्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!