
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त स्टेजवर सत्कार समारंभ व फळे वाटप करण्यात आले..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ११ सप्टेंबर २०२५ ईद-ए-मिलाद-उन-नबी या पवित्र पर्वानिमित्त शहरात मोठ्या उत्साहात आणि श्रद्धाभावाने जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकानाहून मिरवणूक काढली जाते व पिंपरी चौक डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे जुलूस समाप्त केला जातो व हजरत मोहम्मद पैगंबरांविषयी मार्गदर्शन केले जाते पैगंबरांचा संदेश जनते पर्यंत पोहोचवला जातो जयंती निमित्त आझाद वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने नेहरू नगर येथे मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच फळे वाटप करण्यात आले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सालार भाई शेख, जावेद शाह, खाजा नदाफ, अहेमद शेख, खलील शेख, समीर शेख, अप्सर सय्यद, इरफान शेख, इम्रान शेख, मारुती काळे, फय्याज शेख यांनी सहकार्य केले.



