आरोग्यआर्थिकमहाराष्ट्रमूंबईराजकीयविशेषसामाजिक

गुटखा बंदी झाली, पण गुटख्याचे कारखाने बंद का नाही होत!- अंबादास दानवे

प्रतीनीधी सतिश वि.पाटील मुबंई दि. ११ सप्टेंबर २०२५ विधान परिषद सभागृहात मा. अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते (उ.भा.ठा. ) यांची मागणी राज्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू आहे. मूळ उत्पन्नावर कारवाई होत नाहीतर छोट्या टपरी चालकावर कारवाई केली जात आहे.१ जून २०२५ रोजी इगतपुरी येथे गुटख्याचे दोन ट्रक पकडले गेले. ठाणे येथे सुद्धा मागील काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर गुटखा पकडला गेला होता. सदरील खात्याचे अधिकारी नाहीतर वरिष्ठ पदावरील अधिकारी यांचा या गुटख्याच्या विक्रीत समावेश आहे. गुटखा विक्रीत गंभीर आरोपी असणाऱ्या गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. पोलिस या गुन्हेगारांवर कारवाई करण्यापेक्षा ड्रायव्हर वर कारवाई करतात. सहभागी पोलिस अधिकारी आणि पोलिस संरक्षण असणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आज विधान परिषद सभागृहात दानवे यांनी केली. साधारण गुटखा बाहेरील राज्यात निर्मिती करण्यात येते मग प्रश्न असा की कोणत्या मार्गातून महाराष्ट्र राज्यात आणला जातो. याला सर्व यंत्रणाच जबाबदार आहे. लहान टपरीवर कारवाई फक्त एक दिखावा आहे, गूटखा बनवणारे मालक कधी पकडले जाणार ? असा गंभीर प्रश्न दानवे यांनी यावेळी उपस्थित केला. हल्लीच ठाणे, वसई येथे गुटखा साठा जप्त केला होता. या घातक गुटख्या व्यसनाला चाप बसेल अनेक पिडीत तरुण या व्यसनाला बळी पडतात शाळा व काॅलेज विद्यार्थी ही या व्यसनात गुरफटत जात आहेत, वेळीच या कडे सरकार व गृहमंत्रालय यांनी लक्ष केंद्रित करून धडक कारवाई करून गुटखा किंग व दलाल यांना जेरबंद करण्यात यावे ! असे विधान परिषदेत मा. अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते (उ.भा.ठा. ) यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!