अभिवादनभेटीगाठीमहाराष्ट्रविशेषशहरशोध इतिहासाचा..सामाजिक

प्रबुद्ध मैत्री संघाची वर्षावास निसर्ग धम्मसहल संपन्न…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ सप्टेंबर २०२५ दरवर्षीप्रमाणे वर्षावासानिमित्त कोंडाणे बौद्ध लेणी कर्जत येथे १४ सप्टेंबर रोजी प्रबुद्ध मैत्री संघ आदर्श नगर मोशी पुणे यांनी धम्म सहल आयोजित केली होती.
पाच वर्षाच्या मुलापासून ७५ वर्षाच्या आजीपर्यंत संघाच्या उपासक, उपासिका तरुण मुले, मुली यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गेल्या तीन महिन्यापासून तयारी सूरू असलेल्या व चालायला अत्यंत खडतर व शारीरिक, मानसिक परीक्षा घेणाऱ्या कोंडाणे लेणीवर जाताना पंचशीलमय धम्म रॅली, तसेच स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण करण्यात आले. लेणीवर बुद्ध वंदना, त्रिशरण पंचशील घेण्यात आले. लेणी संवर्धक विकास धनवेसर व प्रशांत आगळे सरांनी कोंडाणे लेणी तेथील स्तूप, शिलालेख व धम्मलिपी बद्दल उपस्थितांना माहिती दिली. जास्तीत जास्त लोकांनी बौद्ध लेणीवर जायला हवे असे तळमळीचे आव्हान त्यांनी यावेळी केले. धम्म बंधू संतोष तायडे यांनी सर्वांचे आभार मानले. एक पाऊल लेणी कडे, जिथे लेणी तिथे आम्ही, लेणी संवर्धन हाच आमचा ध्यास, तसेच २२०० वर्षांपूर्वीचा चक्रवती सम्राट अशोकाने बांधलेल्या लेण्याचा, स्तूपांचा, शिलालेखांचा इतिहास सर्वांना माहिती व्हावा यासाठी लेण्यांचा प्रचार प्रसार, जागृती करण्याचे काम प्रबुद्ध मैत्री संघ हा गेली अनेक वर्षापासून करीत आहे.
धम्म सहलीला विशेष सहकार्य विकास धनवे सर, प्रशांत आगळे सर व अशोक वंजारी, जगत शिंदे तसेच त्रिरत्न बुद्ध विहार कमिटी, नायगाव, मावळ, संत कृपा ट्रॅव्हल्स मोशी, यांनी केले
धम्म सहल यशस्वी करण्यासाठी वृक्ष, लेणी मित्र ज्ञानेश्वर दांडगे, अशोक तूपसौंदर, ॲड प्रताप जाधवसाहेब, सुभाष वाकळे गुरुजी, चेतन पाखरे, गंगाधर खडसे, दीपक भगत व महिला समन्वयक रिताताई तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांना सुरेख साथ चतुर्थी, सोनाली पुंडकर, कोकिळाताई इंगोले, मनीषा मोरे, शोभाताई तुरुकमारे, अर्चना कांबळे यांनी दिली
तसेच प्रबुद्ध मैत्री संघाचे अध्यक्ष नरेंद्र प्रगणे, सचिव साहेबराव गोपाळे, खजिनदार संतोष तायडे, मारुती तुरुकमारे, विनोद मोरे, जयदेव पुंडकर, गजानन वारुळे, रमेश केदारी कु. मयूर पुंडकर व धम्म सेवक राजू वस्तला चंद्रकांत कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!