अभिनंदनउत्सवदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

डाॅ. प्रिया अशोक शेजुळे यांचा भव्य नागरीक सत्कार पिंपरी चिंचवड येथे संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ सप्टेंबर २०२५ दोन दिवसांपूर्वी म्हणजे दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी पिंपरी चिंचवड नालंदा फाऊंडेशन प्रांगणात विदर्भाची कन्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील अशोक शेजुळे व अनिता शेजुळे यांची सुपुत्री डाॅ. प्रिया अशोक शेजुळे यांचा नागरिक सत्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे उपायुक्त आण्णा बोदडे आणि सामाजिक कार्यकर्ते राजन नायर यांच्या हस्ते व सामाजिक, क्रिडा, शैक्षणिक, मिडीया, आंबेडकर चळवळीचे कार्यकर्त्यांव्दारा करण्यात आला.
डाॅ. प्रिया यांचा सत्कार करते वेळी सामाजिक कार्यकर्ते मा. राजन नायर यांनी खूप कौतुक केले. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे काम डाॅ. प्रिया यांच्याकडून होईल, कारण त्यांनी या ठिकाणी पोहोचण्यासाठी, भारतीय अंतराळ संशोधन संस्थे मध्ये शास्त्रज्ञ या पदावर येण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समोर ठेवले. कारण शिक्षण, कर्तव्य, हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकातून व बाबासाहेब यांच्या प्रेरणेतून मिळते. त्यांनी शिक्षणाला फार महत्व दिलेले आहे. आणि डाॅ. प्रिया शेजुळे विदर्भाच्या येवतमाळ जिल्हय़ातील पुसद तालुक्यातील महात्मा मुंगसाजी विद्यालयात पूर्व प्राथमिक शिक्षण व नंतर राणी लक्ष्मीबाई विद्यालयात. अभ्यासात हुशार असल्याने के. डी. हायस्कूल पुसद मध्ये एस. एस. सी. परिक्षेत गुणवंत यादीत नाव मिळविले. पिंपरी एन काॅलेज पुसद या ठिकाणाहून उच्च माध्यमिक शिक्षण पुर्ण करून तिला देशातील नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालय सिओईपी पुणे येथे प्रवेश मिळाला. एन आय टी, एम टेक आणि नंतर आय. आय. टी. गुवाहाटी येथे पिएचडी करत खुल्या वर्गातून हे पद मिळविले आहे. अशा ऐतिहासिक, वैज्ञानिक जागेत ही भीम कन्या पोहोचली आहे. आणि हि गोष्टी लक्षात घेऊन ती वाॅटर रिसोर्सेस मध्ये पिएचडी करत असताना पूर्ण व्यवस्थापन आणि सुधारीत पर्जन्यमान अंदाज या विषयावर केलेल्या उत्कृष्ट संशोधनासाठी तिला पंतप्रधान संशोधन फेलोशिप मिळाली. डाॅ. एपीजे अब्दुल कलाम आणि डाॅ. तेस्सी थाॅमस मॅडम यांच्या सारखे शास्त्रज्ञांनी इस्त्रोमध्ये नाव उंच केले तसेच डाॅ. प्रिया शेजुळे यांनी महाराष्ट्र व भारत देशाचे नाव उंचावले.
सन्माननीय कन्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि तरूणांसाठी प्रेरणास्थान देणारे आहे. संघर्षमय जीवन प्रवासातील लाखो तरुणांना आशेचा किरण व प्रेरणा स्त्रोत ठरत आहे. यावेळी नायर म्हणाले की मी विशेषतः डाॅ. प्रिया यांचे तर कौतुक करतोच पण त्यांचे आईवडिलांचे देखील कौतुक करतो की त्यांच्या मुलीचे त्यांनी छान संगोपन केले व शिक्षण घेण्यासाठी पाठिंबा दिला. तरूणांना हेच सांगू इच्छितो की, आजच्या युगात शिक्षण, वेळ, जिद्द, चिकाटी यांना महत्व द्या. महापुरूषांच्या विचारांना घेऊन चाला. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. डाॅ. प्रिया शेजुळे या भीमकन्येचा सत्कार केल्याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्राचे प्रख्यात गायक अनिरुद्ध सुर्यवंशी, प्रख्यात कवी अशोक गायसमुद्रे, आणि आदरणीय गायिका सुमनताई चोपडे यांनी मला या संदर्भात निमंत्रन दिले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करितो. या सत्कार सोहळ्यात सुप्रसिद्ध गायक राहुल शिंदे, कमलेश शेजुळ, विजय कावळे, भगवान शिरसाठ, सतीश प्रघणे, कवी गोविंद दादा गाडे, किशोर रणवीर, कैलास शिंदे, सुमेध कल्हाळीकर, प्रतिक सुर्यवंशी, जयराम लांडगे, बी. डी. मोरे, मोहन धिवर, सुधाकर गरड, संजय कांबळे, अमित तायडे, भारत बाबू, समृद्धी उजगरे, सुरेखा कुलाळ, मनिषा धिवर, मनिषा सपकाळे, सुजाता पुणेकर, शिलाबाई साबळे इ.नामवंत गायकांनी यावेळी मनोरंजनाची भूमिका बजावली या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून पिंपरी चिंचवड मधिल सुरेश कसबे साहेब, विशाल कांबळे, पँथर युवा मोर्चाच्या महिला आघाडी अध्यक्षा कमल गायकवाड व त्यांचे सहकारी, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक मान्यवर व संविधान प्रेमी नागरिक व अनेक धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातीलमान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!