आंदोलनगून्हामहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक

देवाभाऊच्या पोस्टर प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मराठा क्रांती मोर्चाची तक्रार…

देवाभाऊ पोस्टर मुळे शिवप्रतीमेची विटंबना : मराठा क्रांती मोर्चा…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २० सप्टेंबर २०२५ छत्रपती शिवाजी महाराज त्यांची राजमुद्रा सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवा भाऊ उल्लेख असलेले पोस्टर महाराष्ट्रात सर्वत्र पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहरात विनापरवाना लावलेले आहेत. काही पोस्टरवर पावसामुळे चिखलाचे पाणी, चिखल उडालेला आहे तसेच काही पोस्टरवर गुटखा पान खाऊन पिचकारी मारल्याचे आढळून आले आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगप्रवर्तक कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्यामुळे मराठा क्रांती मोर्चा सह शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात गुन्हा दाखल झाला आहे परंतु अद्याप विनापरवाना पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. आज शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसंवाद कार्यक्रमासाठी आले होते यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन देऊन देवाभाऊ पोस्टर प्रकरणी तक्रार केली तसेच संतप्त भावना व्यक्त केल्या. संपूर्ण महाराष्ट्रातील अयोग्य जागेवरील पोस्टर काढून टाकावीत विनापरवाना पोस्टर लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्र्यांना छत्रपती शिवरायांचा अवमान झालेले पोस्टरचे फोटो देखील दाखवले. या प्रकरणाची व्यवस्थित माहिती दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी लक्ष घालून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात मराठा क्रांती मोर्चाचे सतीश काळे, वैभव जाधव, प्रकाश जाधव, नकुल भोईर यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!