पिंपरी चिंचवड मनपा.भेटीगाठीमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड शहरातील असंख्य समस्यांबाबत वेल्फेअर पार्टीच्यावतिने उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २० सप्टेंबर २०२५ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यावेळी आशिया खंडात नंबर १ वर आलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आज झीरो वर येऊन ठेपली आहे .
विषयास अनुसरून , पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रकारच्या समस्या बाबत, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे की ,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यावेळी आशिया खंडात नंबरवर आलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आज झीरो वर येऊन ठेपली आहे. कारण पिंपरी चिंचवड शहरात जागोजागी रोडवर खडे पडलेली आहेत, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मेट्रोचे काम चालू आहे पर्यायी मार्ग आहे, परंतु या मार्गाने चालता ही येत नाही तर गाडी कशी चालवावी, मेट्रोच्या ठिकाणी व गर्दीच्या ठिकाणी गाड्यांची गर्दी व अस्ताव्यस्त वाहतूकी मूळे, शिस्त नसल्याने अपघात होतात, तसेच बालाजी नगर कडे आपलं लक्ष वेधून घेत आहे बालाजी नगर भोसरी येथील ड्रेनेज लाईन वरच्या वर जमिनी लेव्हलला अंथरली आहे व सांड पाणी जाण्यासाठी छोट्या छोट्या नाल्या होत्या त्या बंद करण्यात आल्या आहेत त्यामुळे पावसाचे पाणी व ड्रेनेज तुडुंब भरून रस्त्यावर व घरा घरात जात आहे. तसेच लाईटीची समस्या वारंवार लाईट जाणे व रिडींग न घेताच मनमानी बिल देने, हे राजरोसपणे सूरू आहे, नगरपालिकेला व mseb ला तक्रार दाखल करून सुद्धा लक्ष दिले जात नाही ही तक्रार आपणाकडे विनंती पूर्वक निवेदनाद्वारे करत आहोत. निवेदन देते वेळी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सालारभाई शेख, उपाध्यक्ष खाजा नदाफ, इमाम नदाफ, मौलाना एहसान खान, समीर शेख व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!