गून्हानाशिकपिंपरी-चिंचवडपूणेमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

पत्रकार बांधवांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्याचा जाहीर निषेध:- कृष्णा दादा साबळे प्रदेश अध्यक्ष शिवशाही व्यापारी संघ

प्रतिनिधी मुंबई दि. २१ सप्टेंबर २०२५ काल शनिवार (२०/०९/२०२५) रोजी त्र्यंबकेश्वर ( जिल्हा- नाशिक) येथे पत्रकार या नात्याने आपल्या कामासाठी गेलेल्या झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने या तिघा पत्रकारांवर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर काम करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी एकामागोमाग एक दगड, लाथा-बुक्क्यांनी भीषण हल्ला केला. ही बाब अतिशय गंभीर आहे. या निंदनीय कृत्याचा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करित आहोत.
दरम्यान पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी आणि चौथ्या स्तंभावर घाला घालणारी निंदनीय कृत्ये आहेत.
पत्रकार समाजाच्या उन्नतीसाठी, सत्यासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी अहोरात्र काम करतात. अशा पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीने केलेले हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत असा इशारा शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष कृष्णा दादा साबळे यांनी दिला आहे.
“शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात कृष्णा दादा साबळे यांनी निषेध केला.
प्रशासनाने संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तातडीने “पत्रकार संरक्षण कायदा” अंतर्गत कठोर कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा कोणीही पत्रकारांवर हात उचलण्याचे धाडस करणार नाही अशी विनंती शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष कृष्णा दादा साबळे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!