पालिकेच्या स्मार्ट अधिकार्यांनी बनवली पिंपरी चिंचवडची बकाल सिटी..

शोधा म्हणजे सापडेल रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २२ सप्टेंबर २०२५ रस्त्याचे ठेके देताना काय तपासले हा प्रश्न विचारावा कोणाला?
कारण दर्जाहिन डांबरीकरण झाल्याचे पिंपरी चिंचवड मधे सर्वत्रच दिसते आहे. यात काल पिंपरी येथील साईचौक येथील भूयारी मार्ग येथे झालेलेले traffic jam पाहिले असता लक्षात आले की हे जाम रस्त्यात पडलेल्या खड्यांनमूळे झाले आहे. या traffic jam मूळे दिवसभर वाहतूक व्यवस्थित सूरू रहावी म्हणून वाहतूक विभागाचे कर्मचारी दिवसभर वाहनांना यातून वाट काढून प्रवास सूरळीकरून देत होते नेमके सनासूदीच्या काळात झालेले हे traffic jam म्हणजे पालिकेतील भोंगळ कारभाराचे चित्र आहे. यातून आता हे स्पष्ट झाले आहे की पालिका फक्त चांगला भ्रष्टाचार करू शकते चांगले रस्ते बनवूच शकत नाही. जर यावर लवकरात लवकर उपाय शोधला नाही तर पिंपरी चिंचवडकरांच्या सहनशक्तीचा बांध केव्हांही फूटू शकतो.



