आपत्कालमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

विद्यार्थ्यांचे परिक्षा व शैक्षणिक शुल्क माफ करा. शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी संघटनेची मागणी..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २७ सप्टेंबर २०२५ संपूर्ण मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील पीके नष्ट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खुप खालावलेली आहे. त्यांना आपल्या कुटुंबाच्या गरजा भागविणे कठिण झाले आहे. त्यामुळे आपल्या पाल्याचा शैक्षणिक खर्च ते करु शकत नाही. विशेषतः शिक्षणाचा खर्च, परिक्षा शुल्क, शैक्षणिक शुल्क, मासिक भोजनालय खर्च इ. भरणे कठीण झाले आहे.
           ह्या परिस्थितीची दखल घेवून ओला दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, मजूर, अल्पभूधारक, भूमीहीन पाल्यांच्या शैक्षणिक शुल्का संदर्भात विविध मागण्या शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी संघटनेने केल्या आहेत.
प्रमुख मागण्या

१. विद्यापीठांतर्गत शिक्षण घेण्या-या अतिवृष्टी भागातील सर्व विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे पुढील वर्षापर्यंतचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे.

२. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अतिवृष्टी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे.

३. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अतिवृष्टी भागातील विद्यार्थ्यांना चालू वर्षातील वसतीगृह शुल्क माफ करण्यात यावे.

४. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांना अतिवृष्टी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात व वसतीगृह शुल्कात सवलत देण्याबाबत निर्देशित करावे.

५. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अतिवृष्टी भागातील विद्यार्थ्यांना पुढील चार महिण्याकरीता भोजन भत्ता देण्यात यावा.

६. अतिवृष्टीच्या काळात ज्या अर्जांची अंतिम दिनांक उलटून गेली त्या सर्व अर्जांना मुदतवाढ मिळावी.

७. अनेक घरात पाणी शिरल्यामुळे प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य पाण्यात वाहून गेले आहे. त्यांना नवीन साहित्य देण्यात यावे.


राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना तसेच अतिवृष्टी भागातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी या मागण्यांचे निवेदन देणार आहेत. 
अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!