मुलुंड पूर्व येथे मोबाईल आणि पर्स लुटीची घटना गुन्हेगार सीसीटीव्ही फुटेज आधारे ताब्यात..

प्रतिनीधी सतिश पाटील मुबंई दि. ०७ ऑक्टोबर २०२५ सराईत गुन्हेगार देवा पांडे (२२) व गोपी थेवर (२५) यांना पकडण्यात नवघर पोलीसांना यश आले त्यांनी गुन्हाची कबूली दिली आहे.
ऑक्टोबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात पहाटेच्या वेळी ही घटना घडली असून, एका व्यक्तीला लूटमार करताना गंभीर मारहाण करण्यात आली व त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.
मुलुंड पूर्व भागातील महात्मा फुले रोडवर, वीर सावरकर रुग्ण
एका ऑटोरिक्शामध्ये बसलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्या व्यक्तीला अडवून त्याचा मोबाइल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्याने त्यांच्यात झटापट झाली आणि त्या व्यक्तीला धारदार शस्त्रांनी मारहाण करण्यात आली.
पीडित व्यक्ती कामाला जात असता विल्सन बेरेटो (५२) यांचेवर हल्ला झाला, त्यांच्या चेहर्यावर १३ टाके घातले असून पुढील उपचार सायन रूग्णालय सूरू आहे.
पुढील अशा घटना टाळण्यासाठी रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी एकट्याने फिरणे टाळा आणि सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहा असे पोलिस यंत्रना वारंवार सागत असते तरी देखिल मुलुंड मध्ये गुन्हेगारी ही दिवसोंदिवस वाढत आहे.



